- पिंपरी चिंचवड पत्रकार संघाचे आवाहन
- कार्यशाळेत डिजिटल मीडियातील तज्ञ करणार मार्गदर्शन
पिंपरी I झुंज न्यूज : अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न डिजिटल मीडिया परिषदेच्या वतीने पिंपरी चिंचवड येथे राज्यस्तरीय डिजिटल मीडियाच्या कार्यशाळेचे आयोजन आचार्य अत्रे रंगमंदिर सभागृह पिंपरी येथे २० सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत करण्यात आले आहे.
पिंपरी चिंचवड पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिल वडघुले, कार्याध्यक्ष अविनाश आदक, उपाध्यक्ष सुरज साळवे तसेच डिजिटल मीडियाचे अध्यक्ष महावीर जाधव यांनी महाराष्ट्रातील डिजिटल मिळण्याच्या पत्रकारांनी या कार्यशाळेचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे. मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त एस एम देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली कार्यशाळा पार पडणार आहे.
अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मिलिंद आष्टीकर, मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण, बोल भिडू चॅनलचे संपादक चिन्मय साळवी, मुक्त पत्रकार विजया वामन यांचा यावेळी सत्कार करण्यात येणार आहे.
कार्यशाळेत यु ट्यूब,पोर्टल चे संपादक व सर्व पत्रकारांसाठी खास आकर्षण असणार आहे. गुगल आणि यु ट्यूब कडून फायदा मिळण्यासाठी काय करावे लागणार या दृष्टीने देखील अत्यंत महत्त्वाचे मार्गदर्शन लाभणार आहे.