बीड । झुंज न्यूज : बीड शहरातील राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी पक्षाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी रोहन सर्जेराव गायकवाड यांची निवड करण्यात आली.
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या विचारानुसार व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली व राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रेरणेने व नगरपरिषद गटनेते वाल्मीक अण्णा कराड यांच्या मार्गदर्शनाखाली युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हा उपाध्यक्षपदी रोहन गायकवाड यांची निवड करण्यात आली.
यावेळी जिल्हाध्यक्ष सुशांत सिंह बळीराम पवार यांनी त्यांना नियुक्तीपत्र देऊन यापुढील काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून सर्वसामान्य युवकांच्या विकासात चांगल्या प्रकारचे योगदान व मोठ्या संख्येने पक्ष संघटना वाढीसाठी मजबूत प्रयत्न करावे अशी अपेक्षा व्यक्त केली ,व त्यांना पुढील राजकीय भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.