पेरीविंकल स्कूलचा दगडूशेठ मंदिराच्या गाभाऱ्यात थेट सन्मान…

दगडूशेठ ट्रस्ट कडून सन्मान ही भाग्याची बाब – राजेंद्र बांदल

पुणे I झुंज न्यूज : चैतन्य विद्या प्रतिष्ठानच्या पेरीविंकल इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज च्या सूस शाखेचा श्रीमंत दगडूशेठ मंदिर ट्रस्ट आयोजित अथर्वशीर्ष पठणात प्रथम क्रमांक जाहीर!. सलग दुसऱ्या वर्षीही उपक्रम श्रीमंत दगडूशेठ गणपतीच्या थेट दारी.

चैतन्य विद्या प्रतिष्ठानच्या पेरिविंकल इंग्लिश मिडीयम स्कूल च्या सूस शाखेला मागील वर्षी झालेल्या अथर्वशीर्ष पठाणा मध्ये प्रथम क्रमांकाचे बक्षीस जाहीर झाले. यासाठी ऋषिपंचमी च्या दिवशी ३९ हजार महिलांच्या समोर दगडूशेठ हलवाई ट्रस्ट कडून शाळेच्या मुख्याध्यापिका सौ निर्मल पंडित यांना ज्येष्ठ साहित्यिक कवयित्री मा. डॉ. अरुणाताई ढेरे, मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या सूनबाई वृषालीताई शिंदे, हेमंत रासने ,श्री भालेराव व इतर मान्यवर यांच्या हस्ते शेला व मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

यातच दुग्धशर्करा योग म्हणजे पेरीविंकलच्या विद्यार्थ्यांना सलग तिसऱ्या वर्षी दगडूशेठ मध्ये अथर्वशीर्ष पठणा चे आमंत्रण येऊन पुन्हा एकदा योग जुळून आला आहे. इयत्ता 5वी ते 12 च्या विद्यार्थ्यांना व शिक्षकांना मंगळवार दि.१०/९/२४ रोजी पुण्यातील प्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या सभामंडपाच्या गाभाऱ्यात अगदी पुढे बसून अथर्वशीर्ष आवर्तने व पठण करून महाआरतीचा दुग्धशर्करा योग लाभला आहे.

शिक्षणाबरोबरच आपल्या संस्कृतीचे जतन करण्याकडे पेरिविंकल चा कायमच कल असतो. पेरिविंकल च्या सूस शाखेमधून मागील वर्षी सकाळी ४ वाजता ४ बसेसचे विद्यार्थ्यासाठी शाळेने नियोजन केले होते. बसमधून सुमारे ३०० हून अधिक विद्यार्थी व २५ शिक्षकवृंद हे दगडूशेठ येथील मंदिराच्या गाभाऱ्यात अथर्वशीर्ष आवर्तनाला अगदी उत्साहाने उपस्थित राहिले होते. पहाटे श्रींच्या आरतीचा लाभ घेऊन 5 ते 6 गणपती अथर्वशीर्ष आवर्तने करून नंतर परत शाळेत जाऊन वेळापत्रकाप्रमाणे तासिका करून विदयार्थी घरी गेले होते आणि त्याचेच हे फळ म्हणून आज हे प्रथम पारितोषिक आहे असे प्रतिपादन संस्थेचे संस्थापक मा श्री राजेंद्र बांदल सर यांनी केले.

श्रीमंत दगडूशेठ प्रतिष्ठान यांच्या कडून निमंत्रण पत्र शाळेला प्राप्त झाले होते. श्रीमंत डग्डुशेठ हलवाई मंडळाच्या वतीने शाळेच्या संचालिका सौ रेखा बांदल व मुख्याध्यापिका सौ निर्मल पंडित यांचा शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. तसेच सर्व शिक्षकवृंद यांचा देखील सन्मान करण्यात आला होता.

अशा प्रकारे गणेश उत्सवात दगडूशेठ येथे जाऊन गणपती अथर्वशीर्ष पठण करण्याचा एक आगळा वेगळा उपक्रम पेरिविंकलच्या सूस शाखेने मागील राबवला व यावर्षीही निमंत्रण असल्याने तो योग जुळून सलग तिसऱ्या वर्षी आला आहे ही खरोखरच भाग्याची गोष्ट आहे.लाखो भक्तगणात दगडूशेठ येथे अथर्वशीर्ष आवर्तन करण्याचे निमंत्रण येणे हीच खूप भाग्याची बाब आहे.

या संपूर्ण आगळ्या – वेगळ्या उपक्रमाचे आयोजन हे शाळेचे संस्थापक अध्यक्ष श्री राजेंद्र बांदल व संचालिका सौ रेखा बांदल यांच्या अध्यक्षतेखाली शाळेच्या मुख्याध्यापिका सौ निर्मल पंडीत यांच्या नियोजनेखाली HOD सचिन खोडके सर यांच्या समवेत करण्यात आले होते.

दगडूशेठ गणपती मंदिर कडून येवढा सन्मान प्राप्त होणे ही खरंच भाग्याची बाब असून या सर्वाचे श्रेय हे सुस शाखेतील सर्व विदयार्थी, शिक्षवृंद , कायम पाठिंबा असलेले शाळेचे संस्थापक अध्यक्ष मा राजेंद्र बांदल सर, संचालिका सौ रेखा बांदल व समस्त पालकवर्ग या सर्वांना जाते असे शाळेच्या मुख्याध्यापिका यांनी नमूद केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *