*>* म्हात्रे यांना लगेच अटक करा ; अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेची मागणी
मुंबई । झुंज न्यूज : बदलापूर येथील महिला पत्रकार मोहिनी जाधव यांच्याशी असभ्य, अपमानास्पद भाषा वापरल्याबद्दल शिंदे गटाचे शहराध्यक्ष वामन म्हात्रे यांच्या विरोधात ॲट्रॉसिटी आणि महिलांवरील अत्याचार प्रतिबंधक कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे..
मोहिनी जाधव काल दुपारपासून वामन म्हात्रे यांच्या विरोधात गुन्हा दाखल व्हावा यासाठी प्रयत्न करीत होत्या मात्र वामन म्हात्रे यांचे राजकीय संबंध लक्षात घेऊन बदलापूर पोलीस गुन्हा दाखल करायला टाळाटाळ करीत होते.. मात्र राज्यभरातील पत्रकारांची संतप्त प्रतिक्रिया लक्षात घेऊन पोलिसांना अखेर गुन्हा दाखल करणे भाग पडले..
आज सायंकाळी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.. वामन म्हात्रे यांच्यावर खालील कलमे लावण्यात आली आहेत. भारतीय न्याय संहिता 2023 कलम 74, भारतीय न्याय संहिता 2023 कलम 79, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती ( अत्याचार प्रतिबंधक ) अधिनियम 1989, कलम 3(1) ( व ) (2), कलम 3(2) (va). दोन्ही गुन्हे अजामीनपात्र असल्याने पोलिसांनी वामन म्हात्रे यांना लगेच अटक करावी अशी मागणी अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांनी केली आहे.