पिंपरी I झुंज न्यूज : पिंपरी चिंचवड महापालिकेचे सह-शहर अभियंता यांनी कार्यकारी अभियंता असताना महापालिकेच्या ताब्यात जागा नसताना पवना बंद पाईप लाईनची निविदा काढली व त्या योजनेला महापालिकेचे आता पर्यंत १२५ कोटी रुपये खर्च झाले आहेत. गेल्या पंधरा वर्षात ही योजना शेतकऱ्यांचा विरोध असल्याने पुर्ण होवू शकली नाही. त्याला सर्वस्वी जबाबदार हे सध्याचे सह.शहर अभियंता रामदास तांबे आहेत.
त्यांच्या चुकीच्या निर्णयामुळे महापालिकेचे करोडो रुपये खर्च झाले आहेत ते त्यांच्या निवृती वेतनातून व पेन्शनच्या रकमेतून वसूल करावे , अशी मागणी पिंपरी चिंचवड मधील माहिती अधिकार कार्यकर्ते रमेश नानासाहेब वाघेरे यांनी महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
तत्कालीन कार्यकारी अभियंता रामदास तांबे यांनी महापालिकेच्या ताब्यात जागा नसताना घाई घाईत स्वतः च्या फायद्यासाठी निविदा काढली त्यामुळे शहरातील करदात्या नागरिकांचे सुमारे १२५ कोटी रूपये वाया गेले आहेत ते फक्त आणि फक्त रामदास तांबे यांच्या चुकीच्या निर्णयामुळे वाया गेले आहेत. त्यामुळे हे १२५ कोटी रूपये त्यांच्या निवृती वेतनातून आणि मिळणाऱ्या पेन्शन मधून वसूल करण्यात यावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते रमेश वाघेरे यांनी आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.