लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंत्ती महोत्सव व्यापक स्वरूपात व्हावा – आमदार अमित गोरखे

नागरिकांच्या विविध प्रश्नांसाठी नववनिर्वाचित आमदार अमित गोरखे महापालिका आयुक्तांच्या भेटीला

पिंपरी I झुंज न्यूज : लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंत्ती महोत्सव व्यापक स्वरुपात व्हावा ,राज्यातील नामवंत विचारवंत ,साहित्यिक व कलाकार यांचा समावेश झाला पाहिजे अशी मागणी महापालिका आयुक्त शेखर सिंग यांना नवनिर्वाचित आमदार अमित गोरखे यांनी केली आहे.

दरवर्षी पिंपरी चिंचवड महापालिका लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंत्ती महोत्सव साजरा करीत असते त्या पाश्वभूमीवर नवनिर्वाचित आमदार अमित गोरखे यांनी पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंग यांची भेट घेतली .तसेच शहरातील नागरिकांच्या विविध प्रश्नांवरती पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त श्री शेखर सिंग यांची भेट घेतली.

यावेळी शहरातील नागरिकांचे ,झोपडपट्टीतील विविध प्रश्न मोठ्या प्रमाणावर प्रलंबित होते, त्यासाठी स्थानिक नागरिकांना सोबत घेऊन अमित गोरखे यांनी आयुक्तांशी महापालिकेत चर्चा केली, लवकर या प्रश्नांना सोडवण्यात यावे असे ही यावेळी सांगण्यात आले.

“पिंपरी चिंचवड महानगरपालिका तर्फे दर वर्षी 01 ऑगस्ट ते 05 ऑगस्ट या दरम्यान ” प्रबोधन विचार पर्व ” च्या माध्यमातून साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव साजरा केला जातो. या जयंती उत्सवा मध्ये विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित करून महाराष्ट्रातील थोर विचारवंत,कलावंत, यांच्या माध्यमातून साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे विचारांची आदान प्रदान केली जाते. त्या भव्य दिव्य कार्यक्रमाला महापालिके कडून जास्तीत जास्त निधी मिळावा यासाठी साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समितीतील अध्यक्ष व समिती सदस्यां यांना सोबत घेऊन माननीय आयुक्तांची यासंदर्भात चर्चा केली असता आयुक्तांनी यावर सकारात्मक निर्णय घेऊ असे आश्वासन दिले.

“यावेळी अमित गोरखे म्हणाले,  पिंपरी चिंचवड मधील नागरिकांसाठी मी सदैव तयार आहे त्याचबरोबर महापालिका असो किंवा राज्य शासन असो यांच्या माध्यमातून मी नक्कीच येथील नागरिकांच्या समस्या सोडवण्यात प्रयत्न करीन.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *