शिरूर I झुंज न्यूज : शिरूर तालुक्यातील टाकळी भीमा येथील प्रतिष्ठित शेतकरी व मा सैनिक किसन दगडू वडघुले ( वय वर्षे ८४) यांचे शुक्रवार, दिनांक ०९/१०/२०२० रोजी पहाटे त्यांचे वृध्दापकाळाने निधन झाले. त्यांच्या जाण्याने पंचक्रोशीत हळहळ व्यक्त केली जात आहे.
त्यांच्या पाठीमागे दोन मूले, दोन मूली, सूना नातवंडे व एक भाऊ असा परिवार आहे. शिवसेना मा. तालुका प्रमुख, साप्ताहिक झुंजचे संपादक व पिंपरी चिंचवड पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिल वडघुले, शिवसेना शाखा प्रमुख बजरंग वडघूले यांचे ते वडील होते तर वि.वि.का.सोसायटीचे चेअरमन संपत वडघुले यांचे ते बंधू आणि दै. लोकमतचे वार्ताहर प्रसाद वडघुले यांचे ते आजोबा होते.
गावातील प्रत्येक सामाजिक कार्यामध्ये ते सहभागी असत. आपल्या मनमिळावू व प्रेमळ स्वभावाने जिवाभावाची चांगली माणसं त्यांनी जोडली होती. गुरुवार १५/ १०/ २०२० रोजी भीमा नदीच्या तीरावर त्यांचा दशक्रिया विधी होणार आहे.
“किसान वडघुले यांचा जन्म २५ /६ / १९३८ रोजी टाकळी भिमा येथे जन्म झाला. परिस्थितीने त्यांना आपले शिक्षण अर्धवट सोडावे लागले. त्यानंतर मुंबई बोरिबंदर येथील छत्री कारखान्यात नोकरी करत असताना भारतीय सैन्यदलात बाॅम्बे इंजिनिअरिंग ग्रूप मध्ये १९६० साली भरती झाले. देशसेवा करत असताना १९६२, १९६५ आणि १९७२ सालीच्या युद्धांमध्ये सक्रिय जबाबदारी पार पडल्यामुळे त्यांना बढती भेटली. २४ वर्ष देशसेवा केल्यानंतर नाईक सुभेदार पदावर त्यांनी निवृत्ती घेतली होती. नाम फाउंडेशनतर्फे त्यांना नुकताच नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांच्या हस्ते वीर योद्धा म्हणून पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते.”