मराठवाडा जनविकास संघाच्यावतीने ओझरकरवाडी शाळेत जाळीसह वृक्षारोपण

पुणे I झुंज न्यूज : ||वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे || या जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या उक्तीप्रमाणे पिंपळे गुरव येथील मराठवाडा जनविकास संघाच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ओझरकरवाडी येथे जाळीसह वृक्षारोपण करण्यात आले. शाळेच्या परिसरात वड, पिंपळ, साग, चिंच, करंज, अशोक, बदाम, कडुलिंब अशी विविध प्रकारची झाडे लावण्यात आली.

यावेळी मराठवाडा जनविकास संघाचे संस्थापक अध्यक्ष वृक्षमित्र अरुण पवार, वेदांत गुरुकुल संस्थेचे अध्यक्ष निवृत्ती महाराज बोरकर, रिहे केंद्राचे केंद्रप्रमुख मोरे साहेब, रिहे गावचे सरपंच सारिका मोरे, पोलीस पाटील सारिका मिंडे, ग्रामसेविका सारिका टाकळीकर, शाळेचे मुख्याध्यापक राऊत, अंगणवाडी, सुनंदा ओझरकर, सामाजिक कार्यकर्ते अनिल मोरे, गणपत ओझरकर, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य रामदास ओझरकर, ग्रामस्थ व पालक उपस्थित होते. आभार सहशिक्षिका श्रीमती साबळे यांनी मानले.

निवृत्ती महाराज बोरकर म्हणाले, की वृक्षारोपण चळवळ ही आज जगाची गरज बनली आहे. गरीब, श्रीमंत अशा सर्वांनीच झाडे लावून ती वाढवली पाहिजेत. झाडे ऑक्सिजन देतातच, पण सर्वात महत्त्वचे म्हणजे झाडे सावली, फळे देताना कोणताही भेदभाव करीत नाहीत. त्यामुळे समाजानेही एकसंध राहिले पाहिजे.

वृक्षमित्र अरुण पवार यांनी सांगितले, की मराठवाडा जनविकास संघाच्या वतीने वर्षभरात पाच हजार झाडे लावून जतन करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. आज अन्न, वस्त्र, निवारा आणि शुद्ध हवा या माणसाच्या मूलभूत गरजा बनलेल्या आहेत. त्यामुळे कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीने एक तरी झाड लावून जतन केले पाहिजे. याचाच भाग म्हणून ओझरकरवाडी शाळेत जाळीसह वृक्षारोपण करण्यात आले.

रिहे गावचे सरपंच सारिका मोरे, पोलीस पाटील, सारिका मिंडे, ग्रामसेविका सारिका टाकळीकर यांनीही वृक्षारोपणाचे महत्त्व सांगत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *