महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे शनिवारी चिंचवड येथे राज्यस्तरीय अधिवेशन…

पुणे I झुंज न्यूज : महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईच्या वतीने शनिवारी (दि.१६) चिंचवड (पुणे) येथे राज्यस्तरीय पत्रकार अधिवेशन आयोजित करण्यात आले असल्याची माहिती संघाचे प्रदेश सरचिटणीस डॉ.विश्‍वास आरोटे यांनी दिली. यानिमित्त परिसंवाद तसेच पत्रकार गौरव समारंभ देखील पार पडणार आहे.

शनिवारी सकाळी १० वाजता राज्याचे उपमुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांचे शुभहस्ते व मा.खासदार युवराज संभाजी राजे छत्रपती तसेच भाजपचे महामंत्री श्रीकांत भारतीय यांचे उपस्थितीत उद्घाटन होणार आहे. या उद्घाटन सत्राचे अध्यक्षस्थानी संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे असणार आहेत. आ.महेश लांडगे, आ.आण्णा बनसोडे, आमदार श्रीमती अश्‍विनी जगताप, भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, आ.सौ.उषा खापरे, बालन ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक पुनीत बालन, कोहिनुर ग्रुपचे चेअरमन कृष्णकुमार गोयल, महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह, पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे, राजकीय विश्‍लेषक उदय निरगुडकर, शिवसेना उबाठा गटाचे राज्य संघटक गोविंदराव घोळवे.पत्रकार संघाचे प्रदेश संघटक संजय भोकरे, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

दुपारच्या वेळेत ‘अमृतकाळातील माध्यम स्वातंत्र्य, भविष्य आणि पत्रकारितेतील राम’ या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. ज्येष्ठ लेखक अरविंद जगताप तसेच ज्येष्ठ पत्रकार निरंजन टकले, महेश म्हात्रे, संजय आवटे, मंदार फणसे, सम्राट फडणीस, आशिष जाधव सहभागी होणार आहेत.

सायंकाळी ४ वाजता पुरस्कार सोहळा पार पडणार असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांचे हस्ते राज्यस्तरीय पुरस्कार वितरण केले जाणार आहे. यावेळी खासदार अमोल कोल्हे, आमदार बच्चूभाऊ कडू, राष्ट्रवादी काँग्रेस पवार गटाचे शहराध्यक्ष तुषार कामठे, मनसे नेते अनिल शिदोरे, पत्रकार संघाच्या डिजीटल मिडीया विभागाचे युवा प्रदेशाध्यक्ष सिध्दार्थ भोकरे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

यावेळी आश्‍वासन पत्रकारिता पुरस्कार रवींद्र आंबेकर, उत्कृष्ट पत्रकारिता दिनेश केळूसकर, युध्दवार्ता पत्रकारिता विनोद राऊत, आरोग्य पत्रकारिता संतोष आंधळे, अभिव्यक्ती पत्रकारिता सचिन चपळगावकर, कृषि पत्रकारिता विनोद इंगोले, जिजाऊ पत्रकारिता सुमित्रा वसावे, सद्रक्षणाय पत्रकारिता वैभव सोनवणे, आदर्श पत्रकारिता प्रविण बिडवे, प्रेरणादायी पत्रकारिता सतिष नवले, एकलव्य पत्रकारिता प्रकाश बेळगोजी, शोध पत्रकारिता रोहित आठवले, उत्कृष्ट पत्रकारिता सागर आव्हाड, निर्भिड पत्रकारिता अमोल काकडे तसेच वाशिम पत्रकारिता निलेश सोमाणी, उत्कृष्ट संघटक दशरथ चव्हाण (नवी मुंबई), नयन मोंढे (अमरावती), नितीन शिंदे (ठाणे), महेश पानसे (नागपूर), रमजान मन्सुरी (गुजरात), शिवाजी नेहे (गोवा), राजश्री चौधरी (दिल्ली), किशोर रायसाकडा (जळगाव), रोहिदास गाडगे (पुणे ग्रामीण), भूषण महाजन (जळगाव), शैलेश पालकर (रायगड), राजेंद्र कोरके (पंढरपूर), स्वामी शिरकूल (मुंबई), आरोग्य पत्रकारिता बाबा देशमाने, उपक्रमशील पत्रकारीता प्रभु गोरे (औरंगाबाद), वैभव स्वामी (बीड), आनंद शर्मा (नागपूर), प्रविण सपकाळे (जळगाव), प्रताप मेटकरी (सांगली), अमोल येलमार, प्रदीप शेंडे (नागपूर), आबा खवणेकर (सिंधुदूर्ग), पोपट गवांदे (नाशिक) यांचा गौरव होणार आहे.

या अधिवेशनास राज्यातील शहरी व ग्रामीण पत्रकारांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन संघाचे प्रदेश सरचिटणीस डॉ.विश्‍वासराव आरोटे, उपाध्यक्ष नितीन शिंदे, पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे प्रदेशाध्यक्ष गोविंद वाकडे, प्रदेश प्रसिध्दी प्रमुख नवनाथ जाधव, पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष पराग कुंकुलोळ, उपाध्यक्ष अतुल क्षीरसागर, महादेव मासाळ, सचिव जमीर सय्यद, कार्याध्यक्ष औदुंबर पाडूळे, खजिनदार मिलींद संधान तसेच अ‍ॅढ.संजय माने, योगेश गाडगे, विजय जगदाळे, विकास शिंदे, बेलाजी पात्रे, प्रमोद सस्ते, सागर झगडे, सुनील बेणके, संजय भेंडे, संदीप सोनार आदींनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *