थेरगाव I झुंज न्यूज : सामाजिक श्रेत्रामध्ये गेल्या १५ वर्षा पासूून कार्येरत असणाऱ्या पिंपरी-चिंचवड येथील “श्री फाऊंडेशन” व जेष्ठ नागरिक संघ, गणेशनगर यांनी संयुक्त विद्यमाने महिला दिनाचे औचित्य साधून पिंपरी-चिंचवड “ग” प्रभागामधील स्वच्छता मोहीमेत सहभागी असणाऱ्या (म.न.पा. महिला आरोग्य कर्मचारी), तसेच प्रभागामधील जेष्ठ महिला यांचा तुळस रोप, साडी, पुष्प व पेन देऊन सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता.
यावेळी एकुण ७० महिलांचा सत्कार करण्यात आला. तसेच या महिलांसाठी दैनंदिन जबाबदारी मधून थोडासा विरंगुळा म्हणून KRA Jwellers यांच्या विषेश सहकार्यातून “होम मिनिस्टर” कार्यक्रम घेण्यात आला.
या कार्यक्रमात १) मनीषा लाड (पैठणी-प्रथम पारितोषिक) , २)जयश्री क्षीरसागर (सिल्व्हर कॉइन-द्वितीय पारितोषिक), ३) राणी गरड (सिल्व्हर कॉइन-तृतीय पारितोषिक), ४)अंजना गायकवाड (सिल्व्हर कॉइन -लकी ड्रॉ) या विजेत्या महिलांना बक्षिस वाटप करून त्यांचा सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे सिद्धेश्वर दादा बारणे (उपाध्यक्ष, भाजपा, पिं-चिं शहर), झामाताई बाळासाहेब बारणे (मा. उपमहापौर, पिं-चिं, म.न.पा.), मायाताई संतोष बारणे (मा. नगरसेविका, पिं-चिं, म.न.पा.), करिश्मा सनी बारणे (सामाजिक कार्यकर्ता), प्रशांत घोटे (सहनिरीक्षक, आरोग्य विभाग, “ग” प्रभाग) आदि मान्यवर उपस्थित होते.
श्री फाऊंडेशनचे सुशांत पांडे (संस्थापक/अध्यक्ष), अविनाश रानवडे(उपाध्यक्ष), प्रशांत जाधव, संदीप शिंदे, दादाराव आढाव, गणेश असवले, दिपक श्रीवास्तव, महिंद्र बिंद तसेच जेष्ठ नागरिक संघ, गणेशनगर, थेरगावचे विष्णुपंत तांदळे (अध्यक्ष) गणेश विपट (सचिव), तात्याबा तोरसे (खजिनदार), कृष्णा कळसकर, दिलीप टिंगरे, सुभाष चव्हाण, श्रीमती कुमुदिनी घोडके, तसेच के.आर.ए. ज्वेलर्स (KRA Jwellers) चे गणेश सावंत (असिस्टन्स मॅनेजर), मोसीम शेख, सुवर्णा खैरे, दिलीप देवकर आदि मान्यवर उपस्थित होते.
गणेश विपट यांनी सूत्रसंचालन केले तर श्री फाऊंडेशनचे संस्थापक/अध्यक्ष सुशांत पांडे यांनी आभार मानले.