मुळशी I झुंज न्यूज : हिंजवडी मध्ये डिफेन्स मल्टी स्पोर्ट्स ट्रेनिंग सेंटर वतीने मुळशी रत्न पुरस्कार सोहळा २०२४ आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात आंतरराष्ट्रीय खेळाडू कु. सानिया पप्पू कंधारे हिचा ‘मुळशी रत्न’ पुरस्कार प्रदान करू गौरविण्यात आले.
तसेच या सोहळ्यात किसन भोईर महाराज, सविता दगडे, बाबाजी शेळके, बेलाजी पात्रे, रोहिदास धुमाळ, तानाजी हुळावळे, गणेश जांभुळकर, राम गोमारे, कैलास जाधव, विनोद सुर्वे, हरिभाऊ वाघुलकर, बिपिन देशमुख, संतोष जैद यांना देखील पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
या पुरस्कार सोहळ्यासाठी माजी राज्यमंत्री डॉ ज्ञानेश्वर कांबळे जागतिक व्याख्यात्या शारदा मुंडे, जिल्हा नियोजन समिती सदस्या भारती विनोद , बाबासाहेब बुचडे यांची प्रमुख उपस्थिती होती.