महाराष्ट्राच्या विकासात तेलगू मन्नेरवारलू समाजाचे मोठे योगदान – शिरीष पोरेड्डी

पिंपरी I झुंज न्यूज : तेलगू मन्नेरवारलू समाजाचे महाराष्ट्राच्या विकासात मोठे योगदान आहे असे मत शिरीष पोरेड्डी यांनी व्यक्त केले. तेलगू मन्नेरवारलू ज्ञातगंगा समाजाच्या वतीने आयोजित समाज बांधवांच्या मेळाव्यात पोरेड्डी बोलत होते. रविवार दिनांक ११ फ्रेब्रुवारी रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे हा मेळावा पार पडला.

सदर स्नेहसंमेलनासाठी महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून समाज बांधव स्नेहसंमेलना साठी सह-कुंटुब सह – परिवार उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी कु. विजयाताई मुखेड़कर सेवानिवृत्त अधीक्षक अभियंता, महापारेषण विभाग या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.

दोन सत्रा मध्ये हा कार्यक्रम पार पडला. पहिल्या सत्रामध्ये समाजातील विविध कलाकरांचा विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम तसेच 10 वी 12 वी, पदवी, पदवीका प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ज्या दांपत्यांच्या लग्नाला 25 व 50 वर्ष पूर्ण झाली अशा दांपत्यांचाही सत्कार करण्यात आला. तसेच ज्या समाज बांधवानी उल्लेखनीय कामगिरी केली त्यांचाही विषेश सत्कार करण्यात आले.

दुसऱ्या सत्रामध्ये लहान मुले- मुली, अविवाहीत मुले- मुली व विवाहीत महिलांचा खेळ पैठणीचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमासाठी राज्यभरातून जवळपास 1000 जातीबांधव उपस्थित होते.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शिरीष दत्तात्रय पोरेडी हे होते यावेळी संस्थापक अध्यक्ष विलास सोमा, संस्थापक उपाध्यक्ष श्री विठ्ठल बरमल्लू महिला अध्यक्ष संगीता पोन्नम, कार्याध्यक्ष श्री. जयंत बरशेट्टी, उपाध्यक्ष राकेश नल्ला, सेक्रेटरी डॉ. मुरलीधर बेतेल्लू, श्री. सतीश बरशेटटी, सुहास घंटेल्लू, खजिनदार श्री सुरेश नाथी, समन्वयक श्री नितिन येंबर, राजू चित्तर, माहिती तंत्रज्ञान समन्वयक श्री प्रशांत गुम्मल व सांस्कृतिक समन्वयक श्री. चिन्मय कोराड व त्यांचे सहकारी युवा मंडळ’ आदी प्रमुख उपस्थित होते.

या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी समाजातील कार्यकर्त्यांनी विशेष जबाबदाऱ्या अंत्यत चांगल्या प्रकारे पार पाडल्या श्री. मुरलीधर बेतेल्लू यांनी आभार प्रदर्शन पार पाडले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *