गणेशखिंडच्या माॅडर्न महाविद्यालयात विविधा- प्रदर्शन व विक्री उपक्रम
पुणे I झुंज न्यूज : गणेशखिंड येथील माॅडर्न महाविद्यालयात दरवर्षी विविधा- प्रदर्शन व विक्री हा उपक्रम माजी विद्यार्थ्यांची संघटना “माॅडर्नाइटस् ” यांच्या मदतीने घेतला जातो. तीन दिवसांच्या या उपक्रमात विद्यार्थी स्वतः बनविलेल्या वस्तूंचे, खाद्यपदार्थाचे, हस्तकला वस्तूंचे विविध स्टॅाल्स लावतात. माॅडर्न शेफ, पर्यावरण विषयक पोस्टर व स्लोगन स्पर्धा, पथनाट्य अशा विविध स्पर्धा घेतल्या जातात. माॅडर्न शेफ या पाककला स्पर्धेत विद्यार्थी, माजी विद्यार्थी,पालक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी सहभागी झाले होते.
या वर्षीची संकल्पना मिलेट्सवर आधारित होती. या दोनही स्पर्धांना अतिशय छान प्रतिसाद मिळाला. या वर्षीच्या विविधाचे उद्घाटन मा श्री अभय गाडगीळ, पु.ना.गाडगीळ अँड सन्स, डाॅ पराग कालकर, प्र कुलगुरु सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व आर जे अपूर्वा, रिजनल म्युझिक डायरेक्टर, बीग एफ एम यांच्या हस्ते झाले.
माँडर्नाईटस् या माजी विद्यार्थी संघटनेचे उपाध्यक्ष श्री किरण देसाई म्हणाले प्रत्येक घरातून एक आणि जास्तीत जास्त उद्योजक निर्माण व्हावी त्यासाठी एक प्लॅटफॉर्म तयार करणे विविधाचा मुख्य हेतू आहे.
विद्यार्थ्यांशी बोलताना प्र कुलगुरू डाॅ पराग कालकर म्हणाले ‘एकत्र येऊन सोबत राहून एकमेकांना मदत करणे, सहकार्य करणे व चांगला व्यवसाय उभा करणे व गुणवत्ता देणे याउद्देशाने व्यवसाय केल्यास कोणत्याच व्यवसायाला मरण नाही. इतरांकडून प्रेरणा येऊनच नवे उद्योजक निर्माण होत असतात . विद्यार्थ्यांना स्टॉलमध्ये सहभागी झालेल्या व भावी उद्योजक होणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना त्यांनी शुभेच्छा दिल्या.
श्री अभय गाडगीळ यांनी व्यवसाय क्षेत्रातील अनेक अनुभव विद्यार्थ्यांसोबत कथन केले . त्यामध्ये त्यांनी दोन हजार पगारापासुन सुरवात केली व त्यानंतर ते पार्टनर झाले हे त्यांनी आवर्जून सांगितले. व्यवसाय क्षेत्रातील अनुभव महत्त्वाचे असतात तसेच वेळ थांबत नसतो रिस्क घेणे गरजेचे व आवश्यक असते त्याचबरोबर कुठे थांबायचं हे देखील समजावे लागते असे ते म्हणाले.
RJ अपूर्वा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्यांच्या अनोख्या अंदाजात एक वेगळाच झलक मध्ये विद्यार्थ्यांना त्यांची ओळख करून दिली. व्यवसाय करत असताना किंवा आपले काम करत असताना कोण काय बोलते याकडे लक्ष न केंद्रित करता; लोक काय बोलतील यापेक्षा आपल्या कामाकडे जास्त लक्ष केंद्रित करावे व कामातून आपले कर्तुत्व सिद्ध करावे असे त्यांनी सांगितले .
वेगवगळ्या स्पर्धांचे परिक्षण करण्यासाठी यावर्षी मा मीनाक्षी दातार, सौ मेधा पालकर, श्री श्रीराम काळे, श्री मोहसीन शेख, श्री महेश कचरे, श्री राहुल शिंदे, नमिता पाटील या माननीय पत्रकारांनी काम पाहिले. मा प्राची कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
याही वर्षी विद्यार्थ्यांनी ४० स्टाँल्स लाऊन १६० भावी उद्योजकांनी यात सहभाग घेतला. दोन दिवसांत त्यांनी रु. ३,७८,३७२ ची विक्रमी विक्री केली. यशोगाथा या ओपन फोरम मध्ये कलामंडळाच्या माजी विद्यार्थी तुषार रिठे, विघ्नेश जोशी, सुदनवा पानसे, माधव जोगळेकर,तेजश्री गुगले यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. या नंतर रंगतरंग या सांस्कृतिक कार्यक्रमाने होऊन कार्यक्रमाची सांगता झाली. व त्यानंतर. पारितोषिक वितरण व माजी विद्यार्थी मेळावा होऊन हा कार्यक्रमाची सांगता होईल.
करोना नंतर झालेल्या या कार्यक्रमाला अतिशय उत्तम प्रतिसाद मिळाला असुन सर्वोत्तम विक्री या स्टाॅलवर झाली आहे. उद्योजकिय व व्यावसायिक कौशल्ये शिकण्यासाठी या कार्यक्रमाचे अयोजन माजी विद्यार्थ्यांच्या मदतीने महाविद्याल नेहमीच करत राहील असे प्राचार्य डाॅ संजय खरात यांनी ग्वाही दिली.
या विविधाचे संयोजन डाॅ ज्योती गगनग्रास व प्रा विजया कुलकर्णी यांनी केले. या कार्यक्रमाला मार्गदर्शन डाॅ संजय खरात यांनी केले. कार्यक्रमासाठी पी ई सोसायटीचे सहकार्यवाह प्रा सुरेश तोडकर व उपकार्यवाह डाॅ प्रकाश दिक्षित यांनी प्रोत्साहन दिले.