टीडीआर घोटाळ्या प्रकरणी कारवाई न केल्याचा आरोप
पिंपरी I झुंज न्यूज : वाकड येथील 1500 कोटी रुपयांचा टीडीआर घोटाळ्याला प्रशासनाकडून स्थगिती परंतू दोशी अधिकाऱ्यांवर कारवाई न करता प्रशासन कोणाला वाचवत आहे? त्यामुळे दोषींवर तात्काळ कारवाई व्हावी या मागणीसाठी संभाजी ब्रिगेडच्या वतीने पिंपरी महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर “बेमुदत साखळी उपोषणाला” सुरूवात करण्यात आली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की,पिंपरी चिंचवड महापालिकेचा वाकडमधील 1500 कोटी रुपयांचा टीडीआर घोटाळा उघडकीस येऊन तब्बल दोन महिन्यांचा कालावधी उलटून गेला आहे. या घोटाळ्याचे पडसाद महाराष्ट्र विधानसभेच्या अधिवेशनात ही उमटले होते,त्यानंतर या वाकड टीडीआर प्रकरणाला स्थगिती देण्यात आली होती.या प्रकरणात प्रमुख भुमिका असणारे टीडीआर घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार नगररचना विभागाचे उपसंचालक प्रसाद गायकवाड व इतर दोषी अधिकारी अद्याप कारवाई करण्यात आलेली नाही.
यातून मनपा प्रशासन भ्रष्ट अधिकाऱ्यांना वाचवत असल्याचे दिसून येत असल्याने त्यांच्यावर कारवाई व्हावी, त्यांना पदावरुन निलंबीत करण्यात यावे. या मागणीसाठी संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष सतीश काळे हे अनेक दिवसांपासून प्रशासकीय स्तरावर पाठपुरावा करीत आहेत. तसेच काही दिवसांपूर्वी संभाजी ब्रिगेडच्या वतीने महापालिकेसमोर “धरणे आंदोलन” करण्यात आले होते. तरी प्रशासनाकडून कारवाई न झाल्याने संभाजी ब्रिगेडच्या वतीने मनपा प्रवेशद्वारासमोर “बेमुदत साखळी उपोषणास सुरुवात करण्यात आली आहे.
यावेळी साखळी उपोषणात संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष सतिश काळे,पुणे जिल्हा अध्यक्ष गणेश दहिभाते जिल्हा कार्याध्यक्ष लहू लांडगे,शहर कार्याध्यक्ष रविंद्र चव्हाण,उपाध्यक्ष रावसाहेब गंगाधरे सचिव नकुल भोईर जिजाऊ ब्रिगेडच्या कल्पनाताई गिड्डे,मोनल शिंत्रे,पांडुरंग प्रचंडराव,ॲड.मोहन अडसूळ,कष्टकरी कामगार पंचायतचे उपाध्यक्ष अनिल गाडे,जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर,विशाल जाधव,वसंत पाटील,शरद आवटे,ज्योती जाधव,अरुण झुंजाराव,ज्ञानेश्वर जाधव, शरद थोरात,शशिकांत आवटे,किरण खोत,विजयराव तापकीर, कैलास बनसोडे, दयानंद चव्हाण , नारायण म्हके, संतोष देवकर,अविनाश कांबळे, अविनाश पाखरे, राजू भालेराव यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी सहभाग घेत उपोषण केले.