पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत संताजी जगनाडे महाराजांना अभिवादन !

पिंपरी I झुंज न्यूज : थोर संत संताजी जगनाडे महाराजांनी आपल्या कुशाग्र बुद्धिमत्ता आणि उत्तम स्मरणशक्तीच्या आधारे जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या गाथा पुनर्लेखनाचे काम केले आणि आपल्या कर्तव्यदक्षतेचा उत्तम परिचय सर्वांनी दिला असे मत अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांनी व्यक्त केले.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने संताजी जगनाडे महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमधील संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेस अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांनी पुष्पहार अर्पण अभिवादन केले यावेळी ते बोलत होते.

या कार्यक्रमास उप आयुक्त मनोज लोणकर, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक,श्री.संताजी महाराज पालखी सोहळ्याच्या माजी अध्यक्षा ९० वर्षाच्या बनारसी राऊत, सामाजिक कार्यकर्ते अनिल राऊत,भरत चौधरी, संजय शेलार, राजेश चौधरी, गोविंद चौधरी, किशोर चौधरी, सचिन साटेकर, सुहास शेटे, प्रथमेश आंबेरकर, सुनिल खुर्देकर, दिनेश दिवटे, अक्षय खानविलकर, रत्नप्रभा चौधरी, निलांगी राऊत,डाॅ.सरोज आंबिके,डाॅ.गणेश आंबिके, संतोष साखरे, शिवराज शेलार, संजय जगनाडे, प्रविण खानविलकर, विजय महाडीक, गुरूनाथ बिळकर, सुहासिनी नाटेकर, प्रदिप सायकर, दिलीप चौधरी, शैलजा चौधरी, राजेश खानविलकर, अनिल चौधरी,तुकाराम चौधरी,विकास चौधरी,रमेश चौधरी,सचिन काळे, प्रणाली खानविलकर, विधीता आंबेरकर आदी उपस्थित होते.

संत श्री संताजी जगनाडे महाराज यांचा जन्म ८ डिसेंबर १६२४ रोजी पुणे जिल्ह्यातल्या मावळ तालुक्यातील सुदुंबरे या गावी झाला,त्यांनी भजन कीर्तनातून समाज प्रबोधन केले असून त्यांचे अभंगही प्रसिद्ध आहेत.संताजी महाराज यांची जयंती महाराष्ट्रातील शासकीय कार्यालयात साजरी करण्यात येते.

   

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *