शिरुर तालुका शिवसेना पक्षाची बैठक संपन्न ; तालुका स्तरीय शासन नियुक्त समित्यांवर कार्यकर्त्यांची नियुक्ती होणार

शिरूर I झुंज न्यूज : तालुका स्तरीय शासन नियुक्त समिती तयार करण्यासाठी नुकतीच शिरुर तालुका शिवसेना पक्षाची बैठक वाघेश्वर लॉन्स मांडवगण फराटा येथे संपन्न झाली. जेष्ठ शिवसैनिक, गणेगांव दुमालाचे मा सरपंच पोपटराव निंबाळकर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी तालुका प्रमुख सुधीर बाळासाहेब फराटे इनामदार, तालुका महिला संघटक चेतनाताई जयकुमार ढमढेरे, विधानसभा संघटक विरेंद्र दत्तात्रय शेलार, तालुका समन्वयक महिला आघाडी सुमनताई वाळुंज, उपतालुका प्रमुख रोहिदास शिवले, उपतालुका प्रमुख संजय विनायक पवार, उपतालुका प्रमुख अनिल माणिकराव पवार, उपतालुका प्रमुख संतोष तुकाराम भोंडवे, उपतालुका प्रमुख अमोल हरगुडे, मा. उपतालुका प्रमुख आंनदराव हजारे, मा. उपतालुका प्रमुख संतोष ज्ञानदेव काळे, मा. शेतकरीसेना तालुका प्रमुख योगेश विठ्ठल ओव्हाळ, विभाग प्रमुख वडगाव निलेश दत्तात्रय मचाले विभाग प्रमुख शिक्रापूर सणसवाडी गट कौस्तुभ दशरथ होळकर, उपविभाग प्रमुख रांजणगाव सांडस गण भिमराव गणपत कुदळे, उपविभाग प्रमुख न्हावरा गट आंनदराव पंढरीनाथ ढोरजकर, उपविभाग प्रमुख मांडवगण गण शिवाजी नामदेव शिंदे, मा उपतालुका प्रमुख ग्राहक संरक्षण दादा काशिद , गाव प्रमुख उरळगाव भाऊसाहेब बाजीराव कोकडे, गाव प्रमुख न्हावरा गिरीश लक्ष्मण कोरेकर, गाव प्रमुख दहिवडी नवनाथ भाऊसाहेब दौंडकर, गाव प्रमुख सादलगाव सुरज मानसिंग फडतरे, शाखा प्रमुख वडगाव रासाई धनंजय विलास शेलार, शाखा प्रमुख वाजेवाडी संतोष चंद्रकांत पवळे, शाखा प्रमुख सादलगाव गणेश मच्छीन्द्र साळुंके, शिवसैनिक तळेगाव ढमढेरे जयकुमार जगन्नाथ ढमढेरे, युवासेना शाखा अधिकारी सणसवाडी योगेश वामन दरेकर, शिवसैनिक दहिवडी भिवा रामदास उकले यांसोबत अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते .

यावेळी बैठकीमधेच शिरूर तालुका शासकीय समितीसाठी अनेकांच्या नावांची चर्चा करणेत आली. कुणाच्या नावे पदांची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *