हिंजवडी I झुंज न्यूज : हिंजवडी पोलिसांनी ताथवडे येथे बँगलोर – मुंबई महामार्गावर कारवाई करत विक्रीसाठी आलेला तब्ब्ल १८ लाख रुपयांचा गुटखा पकडला आहे. ही कारवाई पोलिसांनी शुक्रवारी (दि.३) ताथवडे येथील हॉटेल न्यू सागर सोमर केली आहे.
या कारवाईत पोलिसांनी वाकाराम ठाकरारामजी जाट (वय १९ रा. खालुंब्रे, मावळ), बोगाराम सुखराम बिष्णोई (वय १९ रा.खालुंब्रे) यांना अटक केली आहे. तर पुरवठादार सुजीत खिंवसरा (रा. कोथरूड) याच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंजवडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक राम गोमारे यांना त्यांच्या बातमीदारा मार्फत खबर मिळाली की, मुंबई हायवेने पुनावळेच्या दिशेने एक पांढऱ्या रंगाची पिकअप गाडी येत आहे ज्यामध्ये गुटखा व तंबाखूचा साठा आहे. त्यानुसार पोलिसांनी ताळवडे येथे सापळा रचून संशयीत गाडी आडवली.
गाडीमधील दोन इसमांकडे चौकशी केली असता त्यांनी सुरुवातील उडवा-उडवीची उत्तरे दिली आहेत.पोलिसांनी गाडीची तपासणी केली असता त्यामध्ये विमल कंपनीच्या गुटख्याचे बॉक्सेस, संगधी तंबाखू असा एकूण १८ लाख १८ हजार रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला.
पोलिसांनी हा गुटखा कोठून आणला याबाबत चौकशी केली असता सुजीत खिंवसरा (रा. कोथरूड) याने विक्रीसाठी आणल्याचे तपासात निष्पन्न झाले. हिंजवडी पोलीस ठाण्यात तीन ही आरोपींवर गुन्हा दाखल केला असून हिंजवडी पोलीस पुढील तपास करत आहेत.
ही कारवाई हिंजवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम पौळ, पोलीस निरीक्षक गुन्हे सिनुल दहिफळे, सोन्याबापू देशमुख, सहायक पोलीस निरीक्षक सागर काटे, राम गोमारे, सहायक पोलीस फौजदार बंडू मारणे, बाळकृष्ण शिंदे, नरेश बलसाने, बापूसाहेब धुमाळ, पोलीस हवालदार योगेश शिंदे, कुणाल शिंदे, कैलास केंगले, विक्रम कुदळ, अरूण नरळे, पोलीस अंमलदार रितेश कोळी, श्रीकांत चव्हाण, चंद्रकांत गडदे, कारभारी पालवे, दत्ता शिंदे, अमर राणे, ओमप्रकाश कांबळे, सागर पंडित यांनी केली.