राष्ट्रवादी ओबीसी सेल शहराध्यक्ष विशालभाई जाधव यांचा आंदोलनाचा इशारा
पिंपरी I झुंज न्यूज : जमशेठजी टाटा उड्डाणपुल नाशिकफाटा ची देखभाल व दुरुस्ती करण्यात यावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिंपरी चिंचवड शहर ओबीसी सेल यांच्यामार्फत अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी निवेदन देताना वरिष्ठ उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे, भोसरी विधानसभा अध्यक्ष संतोष माळी, राष्ट्रवादी युवक काँग्रेस चिंचवड विधानसभा अध्यक्ष विशाल क्षीरसागर, युवा नेते सुहास कुदळे, प्रतीक बगाडे यांसह सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते.
नाशिक फाटा येथील जमशेठजी टाटा उड्डाणपुलाच्या भिंतींवर नैसर्गिकरित्या वड पिंपळ अशा झाडांचे मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. वेळोवेळी आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून सुद्धा त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं पाऊल उचललं जातं नसल्यामुळे आज अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांना निवेदन देण्यात आले सदर भिंतींवर मोठ्या प्रमाणात झाडांचे मुळे वाढत असलेले दिसून येत आहे. भविष्यात त्यामुळे पुलाला तडे जाण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही तरी हे निवेदन देऊन महानगरपालिकेला एक प्रकारे आंदोलनाच्या इशारा दिलेला आहे.
लवकरात लवकर सदर कार्यवाही केली नाही तर येत्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षमार्फत आंदोलन करण्यात येईल असा इशारा ओबीसी सेलचे शहराध्यक्ष बाई विशाल जाधव यांनी दिला.
निवेदनाला उत्तर देताना अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील म्हणाले “एक जागरूक नागरिक म्हणून आपण सदर बाब निदर्शनास आणून दिल्याबद्दल आपले आभार लवकरात लवकर संबंधित विभागाला पत्र व्यवहार करून येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये कारवाई करण्यात येईल.”