सॅम्बो चॅम्पियनशिप स्पर्धेत कुस्तीसाठी बांगलादेश या ठिकाणी निवड
मुळशी I झुंज न्यूज : मुळशी तालुक्यातील कोंढावळे गावातील सुकन्या करणार महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व महाराष्ट्र राज्य स्पोर्ट्स सॅम्बो चॅम्पियनशिप स्पर्धेत कुस्तीसाठी कुमारी सानिया पप्पू कंधारे हिची बांगलादेश या ठिकाणी महाराष्ट्राकडून निवड करण्यात आली आहे. ३० ऑक्टोबर ते ०५ नोव्हेंबर या कालावधीत मध्ये बांगलादेश मधील ढाका या ठिकाणी महाराष्ट्र स्पोर्ट्स सॅम्बो चॅम्पियनशिप स्पर्धेतचे आयोजन करण्यात आले आहे. या ठिकाणी मुळशी तालुक्यातील सुकन्या सानिया कंधारे हि लढत देणार आहे.
कु. सानिया पप्पू कंधारे हिने महाराष्ट्र राज्य स्पोर्ट्स सॅम्बो कुस्ती स्पर्धेमध्ये सोलापूर या ठिकाणी सिल्व्हर मेडल, कदमवाक वस्ती पुणे या ठिकाणी सिल्व्हर मेडल, सह्याद्री क्रीडा संकुल वारजे या ठिकाणी शालेय कुस्ती स्पर्धेत द्वितीय क्रमांक आणि छत्रपती संभाजी महाराज नगर येथे स्पोर्ट्स सॅम्बो कुस्ती मध्ये सुवर्णपदकाने विजयी होऊन भारताकडून प्रतिनिधीत्व करणार असून महाराष्ट्र स्पोर्ट्स सॅम्बो कुस्ती चॅम्पियनशिप स्पर्धेतून बंगला देश या ठिकाणी निवड झाली आहे.
महाराष्ट्राकडून वजनी ५५ किलो मध्ये सानिया कुस्ती खेळणार आहे. तसेच सानिया हि १०० मी धावणे, १०० मी हार्डल, ०४ किलोमीटर धावणे, कुस्ती, कबड्डी, जुदो, आणि स्पोर्ट्स सॅम्बो कुस्ती असे खेळात सहभागी होऊन नाविन्यपूर्ण कामगीरी करत आहे.
सानिया हि कोंढावळे ग्रामपंचायत माजी सदस्य कविता पप्पू कंधारे व पत्रकार पप्पू कंधारे यांची कन्या आहे. तर विशेष दंडाधिकारी अंनतराव चौधरी यांची नात आहे.