मंत्रालय को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे संचालक शरद वणवे यांच्याकडून शुभेच्छा
पिंपरी I झुंज न्यूज : पिंपरी चिंचवड पत्रकार संघाचे सक्रिय सदस्य सुरज साळवे यांची पिंपरी चिंचवड पत्रकार संघाच्या उपाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल मंत्रालय चतुर्थ कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष तसेच मंत्रालय को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे संचालक शरद एकनाथ वणवे यांच्या वतीने संविधानाचे पुस्तक देऊन मुंबई मंत्रालय येथे (दि .१३) सत्कार करण्यात आला. या वेळी वामन सोनोने, पुरुषोत्तम वेडेकर, विजय कांबळे, राम राठोड इत्यादी उपस्थित होते.
या वेळी वणवे म्हणाले की, चालू काळात पत्रकारीता ही समाजाचा आधारस्तंभ आहे. गोरगरिबांना पत्रकारच न्याय मिळवून देऊ शकतात. डिजीटल पत्रकारितेमुळे लोकशाही बळकट झाली आहे. सुरज साळवे यांनी नेहमीच पत्रकारितेच्या माध्यमातून सामान्याची बाजू सरकार व शासनासमोर मांडली आहे. या पुढेही ते गरीबांना न्याय देण्याचा प्रयत्न करतील अशी अपेक्षा करतो. त्यांच्या कामाचे फळ त्यांना मिळाले असून पुढील वाटचालीसाठी त्यांना मंत्रालयातील सहकाऱ्याच्या वतीने व अध्यक्ष या नात्याने शुभेच्छा देतो.
पत्रकार सुरज साळवे यांनी पत्रकारीतेचा वसा सक्षमपणे चालवण्याचा विश्वास या वेळी व्यक्त केला. शुभेच्छा रुपी सन्मानाने भावूक होऊन त्यांनी शरद वणवे व मंत्रालयातील त्यांच्या सहकाऱ्यांचे आभार मानले.