प्रेरणा प्राथमिक विद्यामंदिर मध्ये विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव
थेरगाव I झुंज न्यूज : विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा तसेच शिल्पकलेचा विकास व्हावा यासाठी थेरगाव येथील प्रेरणा प्राथमिक विद्यामंदिर मध्ये रंगीत क्ले माती पासून श्री गणरायाची मूर्ती तयार करून सजावट करण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
स्पर्धेचे आयोजनमुख्याध्यापक महेंद्र पवार व स्पर्धा प्रमुख इंदु जगताप यांनी केले होते. स्पर्धेचे परीक्षण शाळेचे विभाग प्रमुख अशोक खाताळ व प्रवीण कुऱ्हाडे यांनी केले. क्रीडाप्रमुख ज्ञानेश्वर बोरसे, अनिता साखरे, सोनाली वाघमारे, मोहन परहर, ज्योती धुरपते, रेखा नांदोडे, विद्या शिंदे यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन करून प्रोत्साहन दिले.
श्री गणरायाच्या जयघोषात आणि भक्तिमय वातावरणात स्पर्धा पार पडली. स्पर्धेत यश मिळालेले विद्यार्थी पुढील प्रमाणे – प्रथम क्रमांक मयुरेश जाधव, द्वितीय क्रमांक प्रियंका गवळी, तृतीय क्रमांक श्रेयस माने, ‘उत्तेजनार्थ सोहम माने यांनी आपली अनोखी कलाकुसर दाखवत बाजी मारली.