खेळाडूंच्या उत्तम कामगिरीमुळे महापालिकेच्या नावलौकीकात भर – अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप

पिंपरी I झुंज न्यूज : पिंपरी चिंचवड शहरातील विविध खेळाडूंच्या उत्तम कामगिरीमुळे महापालिकेच्या नावलौकीकात भर पडत असून शहराची देश विदेशात क्रिडानगरी म्हणून निर्माण झालेली ओळख अधिकाधिक दृढ होत आहे असे प्रतिपादन अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांनी केले.

शहरातील निगडी येथील अभिश्री राजपूत यांची श्रीलंका येथे २६ ते ३१ ऑगस्ट २०२३ दरम्यान होणाऱ्या युथ एशियन योगा गेम्ससाठी “भारतीय संघाची कोच” म्हणून निवड करण्यात आली आहे तिचा स्पर्धेला जाण्याआधी महानगरपालिकेच्या वतीने अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांचे हस्ते सत्कार करण्यात आला होता त्यावेळी ते बोलत होते.

सत्काराच्या वेळी माजी नगरसदस्य प्रा. उत्तम केंदळे, मुख्य सुरक्षा अधिकारी मेजर उदय जरांडे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक तसेच विविध विभागातील कर्मचारी उपस्थित होते.

भारतीय एशियन गेम्सचे सेक्रेटरी सुरेश गांधी यांनी अभिश्री राजपूत यांची निवड केली असून हा संघ २४ ऑगस्ट रोजी एशियन गेम्ससाठी रवाना झाली. जगताप यांनी या संघाच्या स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या तसेच अभिश्री यांचे उत्तम कामगिरीसाठी कौतुकही केले. अभिश्री या कोया फिटनेस अकॅडमीच्या संस्थापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या संघटनेतून पिंपरी चिंचवड मधील १३ मुलींची या भारतीय संघात निवड झाली आहे. त्यामध्ये अनुष्का रानडे, आर्या जाधव, कवी गायकवाड, रुजल जोशी, आरोही राऊत, मनवा पंडित, मुक्ता जाधव, त्रिशा बंसल, ट्विषा सुहानी, सई निंबाळकर, प्रणिका गावंडे, जानवी मुळूक, अनविका वायकर या सर्वांची निवड झाली आहे.

अतिरिक्त आयुक्त जगताप यांचे हस्ते माजी सैनिक माणिकराव विठ्ठल माने यांचा देखील सत्कार करण्यात आला. त्यांची १८ वर्ष सैन्यदलात तर २१ वर्ष महानगरपालिकेत सेवा झाली आहे.

       

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *