शिरूर I झुंज न्यूज : गुरुकुल अनाथ आश्रम कासारी या ठिकाणी शिवसेना पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे यांचा वाढदिवस तळेगाव ढमढेरे पंचक्रोशीतील शिवसैनिकांच्या वतीने उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी अनाथ आश्रमातील मुलांना खाऊवाटप केले व शालेय साहित्यांचे वाटप करून विद्यार्थ्यांसोबत केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला.
यावेळी शिवसेना महिला आघाडी तालुकाप्रमुख चेतनाताई ढमढेरे विभागप्रमुख नितीन मुळे, उपविभाग प्रमुख दीपक इंगळे, तळेगाव नगरीतील ज्येष्ठ शिवसैनिक बाळासाहेब टिळेकर, अण्णा सो भुजबळ, गणेश दरेकर, ऋषिकेश भुजबळ, युवा नेते मयूर मुळे, सोहम ढमढेरे यांसह अनेक सैनिक उपस्थित होते.