न्याय व स्वाभिमान जिवंत ठेवण्यासाठी शरद पवार साहेब यांची साथ देणार ; युवक शहराध्यक्ष इम्रान शेख यांची भूमिका….

पिंपरी I झुंज न्यूज : राष्ट्रवादी युवक शहराध्यक्ष इम्रान शेख यांनी आपल्या युवक पदाधिकाऱ्यांसोबत आज मुंबई वाय बी सेंटर येथे शरद पवार साहेबांची भेट घेतली.धार्मिक,तेढ,जातीवाद,द्वेष पसरवून देशाच्या एकतेला धोका निर्माण करणाऱ्या समाज कंटकांना रोखण्यासाठी राष्ट्रवादी युवकची पूर्ण कार्यकारणी शरद पवार साहेब यांच्या पाठीशी असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी बोलताना इम्रान शेख म्हणाले “पक्षाकडून मला पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष पदाची जबाबदारी दिली गेली. धर्मनिरपेक्ष विचारांचा आणि पुरोगामी विचारांचा वारसा पुढे घेऊन जाण्यासाठी सर्व जाती धर्मातील,समाज घटकातील युवकांना बरोबर घेऊन त्यांना संघटित करून पक्ष संघटना बळकट करण्याचे काम मी युवक अध्यक्ष म्हणून केले. पक्षाने दिलेली जबाबदारी विश्वास व संधी यास पुरेपूर न्याय देण्याचा मी प्रयत्न केला आहे. तथापि बदलत्या राजकीय परिस्थितीमध्ये जातीयवादी व धर्मांध शक्तीं असलेल्या भाजपला बळकटी मिळू नये म्हणून मी माझ्याबरोबरच्या युवक कार्यकर्त्यांच्या, पिंपरी चिंचवड शहरातील अल्पसंख्याक समाजाच्या भावनांचा व त्यांनी केलेल्या अग्रहाचा मान राखून आदरणीय लोकनेते पद्मविभूषण शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या लोकशाही पूरक व शिव फुले शाहू आंबेडकर या विचारांशी बांधिल राहण्याचा निर्णय घेत आहे.आज सबंध देशामध्ये आणि प्रामुख्याने महाराष्ट्रातील अल्पसंख्याक समाजाला भाजपाकडून लक्ष केले जात असताना. भाजप सारख्या प्रतिगामी विचारांना थोपवण्याची ताकद शरद पवार साहेब यांच्यामध्येच असून शरद पवार साहेब बहुजन समाज अल्पसंख्याक समाज यांची शेवटची आशा आहेत.

उपमुख्यमंत्री अजित दादा पवार हे सदैव दैवस्थानी व सर्वोच्च आदरस्थानी असतील. अजितदादांच्या कार्यकर्तृत्वाविषयी माझ्या मनात नितांत आदर आहे. दादांनी मला जी संधी दिली त्यांच्यासाठी मी दादांचा सदैव ऋणी असेल. शहराध्यक्ष अजित गव्हाणे, माजी महापौर योगेशभाई बहल, नाना काटे आणि इतर सदस्य यांचा देखील मी आभारी आहे. यापुढे शहरातील प्रमुख समस्यावर आवाज उठवण्याचा काम राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून केले जाईल असे ते म्हणाले.

यावेळी मौलाना अब्दुल गफार,ओम शिरसागर, शाहिद शेख, मयूर खरात, रुबान शेख, अजय शिंदे, सूरजपटेल, विकास कांबळे, इरफान शेख, फहीम शेख, मुवाज मुजावर युवक पदाधिकारी उपस्थित होते.

       

FacebookTwitterLinkedinPinterestWhatsappYoutube

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *