अंत्रप्रेन्यूअर क्लब अध्यक्ष पदी शहाजीराव रणवरे

(प्रतिनिधी : संग्राम जगताप)

बारामती | झुंज न्यूज : बारामती एम आय डी सी मधील उद्योजकांची संघटना असलेल्या अंत्रप्रेन्यूअर क्लबच्या अध्यक्षपदी शहाजीराव रणवरे यांची निवड करण्यात आली. यासोबतच उपाध्यक्ष पदी अरुण म्हसवडे, सचिव पदी शंकरराव नायर आणि खजिनदार पदी अनिल काळे यांची निवड करण्यात आली.

“उद्योजकांच्या अडचणी शासन दरबारी मांडून त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करू व एम आय डी सी तील रस्ता पाणी वीज हे सर्व वेळेवर मी मिळावेत म्हणून प्रयत्न करु, असे शहाजीराव रणवरे यांनी संगीतले.”

यावेळी करोनाच्या पार्श्वभूमी वर ” वर्तमान व भविष्यातील उद्योजक” या विषयावर चर्चा करण्यात आली. मावळते अध्यक्ष शंकरराव कचरे यांनी वर्ष भराच्या कार्याचा आढावा घेतला. नरेश तुपे यांनी आभार मानले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *