हिंजवडी I झुंज न्यूज : नेहरू युवा केंद्र संघटन पुणे, युवक संघटन आणि क्रीडा मंत्रालय आणि डिफेन्स मल्टी स्पोर्ट ट्रेनिंग सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त २१ जून २०२३ रोजी हिंजवडी येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज सभागृह येथे योग प्रशिक्षण शिबिर संपन्न झाले.
या वेळी कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून हिंजवडी गावच्या विद्यमान ग्रामपंचायत सदस्या तसेच माजी उपसरपंच मा.सौ.मनीषा ताई हुलावळे , डिफेन्स मल्टी स्पोर्ट ट्रेनिंग सेंटर च्या खजिनदार सौ.माधुरी काकडे, पोलिस दक्ष समितीच्या सदस्या सौ.वंदनाताई साखरे, राष्ट्रमाता जिजाऊ माता पुरस्कृत सौ. शिल्पाताई देवकर आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात श्री.सरस्वती पूजन आणि दीपप्रज्वलन करून झाली. उपस्थित सर्व मान्यवरांचे युगप्रवर्तक स्वामी विवेकानंद चरित्र यांचे पुस्तक देऊन सन्मानित केले. जि.परिषद प्राथमिक शाळेच्या पर्यवेक्षिका सौ.आशालता कटके मॅडम यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनाचे महत्त्व सांगितले.
योग प्राशिक्षिका सौ. सरस्वती (अश्विनी ) जाधव मॅडम यांनी हिंजवडीतील जि.परिषद प्राथमिक हिंजवडी शाळेतील शिक्षक आणि शिक्षिका तसेच शाळेतील विद्यार्थि आणि विद्यार्थिनींना योगाचे प्रशिक्षण दिले. सहभाग घेतलेल्या सर्वांना नेहरू युवा केंद्र आणि डिफेन्स मल्टी स्पोर्ट ट्रेनिंग सेंटर च्या वतीने पाहुण्यांचे हस्ते प्रशस्तीपत्रक देवून गौरविण्यात आले.
या कार्यक्रमाला हिंजवडी ग्रामपंचायतीचे विशेष सहकार्य लाभले. शेवटी सेईको काई कराटे इंटरनॅशनल इंडिया (महाराष्ट्र) चे मुळशी तालुका अध्यक्ष श्री. नितीन काकडे यांनी आभार मानून कार्यक्रमाचा समारोप केला.