पौड I झुंज न्यूज : डॉ बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले व भगवान गौतम बुद्ध व अहिल्याबाई होळकर या महामानवाच्या संयुक्त जयंती निमित्त भिमरत्न पुरस्कार महाराष्ट्र राज्य शारिरीक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघ व एस डी ओव्हाळ सामाजिक संस्था आयोजित भिम रत्न पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या पुरस्कार सोहळ्या दरम्यान महासंसद रत्न खासदार सुप्रिया सुळे, केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री भारत सरकार रामदास आठवले, सावित्री बाई फुले यांच्या माहेरच्या थेट वंशज शांता नेवसे नायगाव सातारा व चंद्रकांत भिंगारे, अध्यक्ष मुळशी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस महादेव कोंढरे, माऊली कांबळे, लोखंडे साहेब तसेच सामाजिक न्याय विभाग प्रविण शिंदे, आर पी आय पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सूर्यकांत वाघमारे साहेब, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष युवक परशुराम वाडेकर साहेब व होम मिनिस्टर फेम अभिनेत्री लेखिका निर्मिती प्रबोधनकार मेघना झुझम उपस्थित राहणार आहेत.
यावेळी मी सावित्री बाई फुले बोलतेय एकपात्री अभिनय सादर करणार आहेत. तसेच तज्ञ संचालक खादी ग्रामोद्योग लहूशेठ चव्हाण , नंदा लोणकर, नगरसेवक उपमहापौर सुनीता वाडेकर , शिवाजी बुचडे , युवासेना सचिव युवा अविनाश बलकवडे, अध्यक्ष राजेंद्र ओव्हाळ, उपाध्यक्ष आर पी आय हे राहणार आहेत. भाऊसाहेब कांबळे , राजेंद्र कोतकर, भिमराव कांबळे , विशाल शेळके आदी पदाधिकारी यांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न होईल .
दरम्यान राजकीय, सामाजिक कला क्रीडा शैक्षणिक शेतकरी वारकरी युवा उद्योजक पत्रकार धार्मिक सहकार विविध क्षेत्रातील समाजात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना भीम रत्न पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे. अशी माहिती भारत भूषण पुरस्कार विजेते भारत सरकार निती आयोग डॉ मच्छिंद्र ओव्हाळ आशिया खंडातील ऑयकान शिक्षक यांनी दिली आहे.