मुळशी I झुंज न्यूज : मुळशी तालुक्यातील कोंढावळे गावातील जेष्ठ नागरिक माजी विशेष दंडाधिकारी अंनता श्रीपती चौधरी यांची नात व अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र प्रदेश सचिव, दैनिक पुण्यनगरी पत्रकार मुळशी तालुका प्रतिनिधी पप्पू कंधारे यांची कन्या कु सानिया पप्पू कंधारे हिची राज्यस्तरीय कबड्डी निवड चाचणी स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
पुणे जिल्हा विभागीय क्रीडा संकुल येरवडा पुणे या ठिकाणी ६६ व्या राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धा २०२२-२३ राज्यस्तरीय कबड्डी निवड चाचणी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या ठिकाणी सोलापूर, अहमदनगर, पिंपरी चिंचवड, पुणे ग्रामीण, पुणे जिल्हा कबड्डी खेळाडू मुली ३८ व मुले १२६ सहभागी झाली होती.
या स्पर्धेत क्रिडा अधिकारी डी एम देवकते, राष्ट्रीय खेळाडू, राष्ट्रीय खेळाडू राजेंद्र मागाडे, एन एस आय प्रशिक्षक राष्ट्रीय खेळाडू सोनाली निकम, यांच्या नेतृत्वाखाली स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे यांच्या उपस्थितीत खेळाडू स्पर्धा घेऊन हि निवड करण्यात आली व कबड्डी खेळाडूंना निवडीचे पत्र देण्यात आले.
२९ मे रोजी औरंगाबाद या ठिकाणी राज्यस्तरीय कबड्डी निवड चाचणी स्पर्धा होणार आहेत. या स्पर्धेत लता लोंढे क्रीडा अधिकारी औरंगाबाद हे काम पाहणार आहेत.
“महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे श्री सिद्धिविनायक महिला महाविद्यालयातील ११ वी विद्यार्थ्यांनी सानिया कंधारे हि मंगला शेंडे क्रीडा शिक्षक यांच्या कडे शाळेतील प्रशिक्षण घेत आहे तर पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशन सदस्य श्री बालाजी प्रतिष्ठान कबड्डी संघ कोथरूड येथील प्रशिक्षक भरत शिळीमकर, राष्ट्रीय खेळाडू नरेंद्र शेडगे यांच्या कडे कबड्डी प्रशिक्षण घेत आहे.