हिंजवडी : जिजाऊ ब्रिगेडच्या मुळशी तालुका अध्यक्ष पदी सायली सचिन शिंदे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. संघटनेच्या जिल्हाध्यक्षा जयश्री गटकुळ यांनी नुकतेच त्यांना निवडीचे पत्र दिले.
सायली शिंदे या पुर्वीपासून आयटीनगरी परिसरात महिला बचतगट तसेच विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून सातत्याने अग्रेसर असून नेरे दत्तवाडीसह आयटीनगरी परिसरात महिलांचे मोठे संघटन निर्माण केले आहे. याच कामाची दखल घेऊन जिजाऊ ब्रिगेडच्या तालुकाध्यक्ष पदी संधी मिळाल्याचे शिंदे यांनी सांगितले.
“तालुक्यातील निर्भिड आणि कर्तृत्वान महिलांना एकत्रित करून पिडीत अन्यायग्रस्त महिलांना न्याय मिळवून देणे, तसेच नव्या पिढीला विषेशतः ग्रामीण भागात महिलांचे सक्षमीकरण, महिला जागृतीे या सारखे विधायक उपक्रम राबवणे. चुकीच्या गोष्टींविरोधात नारीशक्तीचा आवाज बुलंद करत जिजाऊ ब्रिगेडचे काम मुळशीत अधिक गतिमान करणार असल्याचे सायली शिंदे यांनी सांगितले.”