चिंचवड I झुंज न्यूज : जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनाझेशन (जितो) आयोजित मर्यादीत षटकांच्या क्रिकेट सामन्यांत ब्लॅक वॉरियर्स संघाने ब्लू इंडियन्स संघावर रोमहर्षक विजय मिळवीत यंदाच्या ‘ जितो चषकावर ‘आपले नाव कोरले. अत्यंत रंगतदार झालेल्या या स्पर्धेत १५ संघ सहभागी झाले होते.महिला व पुरुष यांनी एकत्र खेळत या समान्यांचा आनंद लुटला.
अंतिम सामन्यात युग कुंकुलोळ ने १४ चेंडूत ४१धावा ठोकल्या. ब्लू इंडियन्स संघासमोर ६९ धावांचे लक्ष होते.शेवटच्या षटकात १८ धावांची आवश्यकता होती. साहील ओसवाल याने अचूक गोलंदाजी केली.आणि १२ धावांनी विजय मिळविला.रंगतदार झालेल्या या सामन्यात सर्वांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले.
महाराष्ट्र रिजन चे खजिनदार राजेंद्र जैन,चिंचवड-पिंपरी जितो चे माजी संतोष धोका,योगेश बाफना, तुषार लुणावत, संजय जैन, दिपेश बाफना,दर्शन सोनिगरा, प्रकाश गादिया,रोहन जैन,अभिषेक जैन,आदेश सोनिगरा, दिशांत सोलंकी यांच्या हस्ते विजयी संघाला १५ हजारांचे पारितोषिक व ‘जितो करंडक’देण्यात आला.उपविजेत्या संघाला १० हजार तृतीय स्थानी असणाऱ्या रेड केपिटल संघाला ७ हजार रुपये पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले.या संघात कर्णधार अक्षय लुंकड याने उत्कृष्ट फलंदाजी केली.
पुरुष गटात युग कुंकुलोळ व महिला गटात प्रेक्षा लुंकड मालिकावीर ठरले.विजय कर्नावट व याशिका लुंकड उत्कृष्ठ फलंदाज ठरले.राहुल चोरडिया व सुहानी पोरवाल यांना उत्कृष्ठ गोलंदाज किताब मिळविला.
स्पर्धेचे प्रायोजक दिलीप सोनिगरा (मोहिनी ज्वेलर्स) होते.खेळाच्या माध्यमातून एकत्रित येत ऋणानुबंध घट्ट व्हावेत या साठी आयोजन केल्याचे अध्यक्ष मनीष ओसवाल यांनी सांगितले.संकेत जैन,प्रणव खाबिया, प्रेम कुंकुलोळ, यश कुंकुलोळ, विशाल सोनिगरा, गौरव पगारिया,निकिता जैन,यश सोनिगरा, साक्षी जैन,रोनक जैन सह युवा ग्रुप व महिला ग्रुप च्या सभासदांनी स्पर्धेचे आयोजन दिले.
या प्रसंगी युवा व महिलांसाठी विविध क्षेत्रात विशेष संधी जितो ने उपलब्ध केल्याचे योगेश बाफना यांनी सांगितले.