पुणे I झुंज न्यूज : देहुगाव भंडारा डोंगर तसेच धाराशिव जिल्हा तालुका तुळजापूर तुळजापूर लातूर बायपास रोड ते आई तुळजाभवानी मातेचे मंदिर ठाण मोरडागाव धारूर या ठिकाणी वृक्षप्रेमींकडून तीन टँकरद्वारे झाडांना पाणी घालून जीवनदान देण्यात आले.
या सेवा कार्यामध्ये भंडारा डोंगर श्री क्षेत्र देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष, सदस्य, सह मित्रपरिवार देहुगाव तुकोबाचे 10 वें वंशज शिवाजी मोरे महाराज, माऊली वृक्षदायी संस्था तसेच देसाई भाऊ मित्र परिवार आणि मराठवाडा जनविकास संघ, एक संघ समिती पिंपळे गुरव, धाराशिव जिल्हा तुळजापूर धारूर गाव लोकनियुक्त आदर्श सरपंच बालाजी पवार, तुळजापूर शहर वृक्षमित्र काळबापू नन्नवरे आणि वृक्ष मित्र सोमनाथ कोरे यांसह अनेक वृक्षप्रेमी सहभागी झाले होते.