यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी यशस्वी प्रयत्न केले ; अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांचे प्रतिपदान

पिंपरी I झुंज न्यूज : यशवंतराव चव्हाण हे प्रागतिक व आधुनिक विचारसरणीचे महाराष्ट्राचे शिल्पकार आणि राज्याचे पहिले मुख्यमंत्री होते. त्यांनी महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांच्या कारकिर्दीत अनेक महत्वपूर्ण निर्णय घेवून राज्य सक्षम करण्यासाठी यशस्वी प्रयत्न केले असे प्रतिपादन अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांनी केले.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने भारताचे माजी उपपंतप्रधान आणि महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या जयंती निमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले.

महापालिकेच्या वतीने पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमधील त्यांच्या प्रतिमेस त्याचप्रमाणे पिंपरी येथील वल्लभनगर एस.टी.स्टँडजवळील आणि यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय येथील त्यांच्या पुतळ्यास अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.
या कार्यक्रमास वाय.सी.एम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे, सहाय्यक आरोग्यधिकारी बाबासाहेब कांबळे, जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक तसेच रुग्णालयातील कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते.

यावेळी बोलताना अतिरिक्त आयुक्त जगताप म्हणाले यशवंतराव चव्हाण यांनी केवळ महाराष्ट्राचेच नव्हे तर देशाचेही नेतृत्व केले. केंद्रसरकारमध्ये उपपंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री, संरक्षणमंत्री तसेच परराष्ट्रमंत्री अशी महत्वाची पदेही त्यांनी भूषविली, तर काही काळ ते विरोधी पक्ष नेतेही होते. महाराष्ट्रातील साखर कारखान्यांची स्थापना, मराठवाडा आताचे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ, तसेच कोल्हापूर येथील छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ, महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठे, मराठी साहित्य संस्कृती महामंडळे, विश्वकोश मंडळे आदी संस्थांच्या स्थापनेसाठी यशवंतराव चव्हाण यांचा सहभाग असल्याचेही अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप म्हणाले.

     

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *