बाबो ! नशिब बदलण्यासाठी एक रात्र सुद्धा पुरेशी ; ३१ वर्षांचा ड्रायव्हर झाला रातोरात ३३ कोटींचा मालक….

मुंबई I झुंज न्यूज : नशीब बदलायला वेळ लागत नाही असं म्हणतात. असाच काहीसा प्रकार भारतीय वंशाचा ड्रायव्हर अजय ओगुलासोबत घडला. दुबईत राहणारा ३१ वर्षीय अजय रातोरात करोडपती झाला आहे. त्याने एमिरेट्स ड्रॉमध्ये ३३ कोटींचे बक्षीस जिंकले आहे.

एवढी मोठी रक्कम जिंकल्यानंतर अजय ओगुला म्हणाला की, मी जॅकपॉट जिंकला आहे यावर माझा अजूनही विश्वास बसत नाही. मला जी मोठी रक्कम मिळाली आहे. त्यामधून मी चॅरिटी ट्रस्ट तयार करणार आहे, त्यामुळे मी माझ्या गावचा विकास करु शकेल.

चारवर्षापुर्वी अजय ओगुला हे नोकरीनिमित्त दुबईमध्ये गेले होते. तिथं गेल्यानंतर त्यांना ड्रायव्हरची नोकरी मिळाली. तिथं त्यांना दर महिन्याला 72 हजार पगार मिळतो.परंतु आता ते करोडपती झाले आहेत.

ज्यावेळी अजयने त्यांच्या कुटुंबियांना करोडपती झाल्याचं सांगितलं त्यावेळी त्यांनी विश्वास ठेवला नाही. परंतु मीडियात बातमी आल्यानंतर त्यांनी विश्वास ठेवला.

अजय यांनी पहिल्यांदा तिकीट खरेदी केलं होतं. त्यांना फक्त लकी ड्रॉ कसा खेळतात हे पाहायचं होतं म्हणून त्यांनी तिकीट खरेदी केलं होतं. त्यांना आपण हे इतकी मोठी किंमत जिंकू असं एकदा सुद्धा वाटलं नव्हतं. EASY6 Grand Prize मध्ये त्यांनी 33 कोटी रुपये जिंकले.

         

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *