शिरूर I झुंज न्यूज : घटनाबाह्य सरकार मधील मंत्री यांच्या बेताल वक्तव्याबद्दल शिवसेना शिरूर तालुक्याच्या वतीने न्हावरा येथे मारो आंदोलन करण्यात आले.
आपला देश स्त्री संस्कृती जपणारा देश आहे. त्यामध्ये आमदार सुषमाताई अंधारे खासदार सुप्रियाताई सुळे असतील. यांच्या बद्दल माजी मंत्री महोदय अब्दुल सत्तार, गुलाबराव पाटील,राम कदम यांनी जे वक्तव्य केले ते घृणस्पद आहे कुठल्याही प्रकारे हिंदू संस्कृती जपणारा नाही. याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि शिवसेना म्हणून पुढच्या काळामध्ये असे बेताल वक्तव्य केले तर शिवसेना पूर्णता : शिवसेना स्टाईलने उत्तर दिले जाईल असा इशारा देण्यात आला.
यावेळी तालुकाप्रमुख पोपट शेलार, उपतालुकाप्रमुख राहुल भाऊ शिंदे, उपजिल्हा संघटक शैलजाताई दुर्गे, शिवअल्प संस्था अध्यक्ष श्रीमती रेश्मा ताई पठाण, तालुका समन्वय सुमनताई वाळुंज, विभाग प्रमुख सुनील करपे, विभाग प्रमुख भीमराव कुदळे, विभाग प्रमुख निलेश मचाले, उपविभाग प्रमुख अनिल सातकर, शाखाप्रमुख गिरीश कोरेकर, शाखाप्रमुख गणेश शिवले, संतोष गव्हाणे, नवनाथ करपे, गहीनाथ डोंगरे, लक्ष्मण भोस व शिवसेना युवासेना शिवसैनिक उपस्थित होते.