कामगार, उद्योजकांनी एकमेकांना समजून घेण्यासाठी सर्वांनी संघटीत राहिले पाहिजे ; हभप चौधरी महाराज यांचे प्रतिपादन…

पिंपरी I झुंज न्यूज : बाजारात द्राक्षाच्या घडाची किंमत जास्त असते, घडातून अलग झालेली (सुटी) द्राक्षे घ्यावयाची झाल्यास त्याची किंमत कमी असते. यातून लक्षात येते की, संघटीत असले तरच आपली किंमत आहे. असे मत आदरणीय हभप किसन महाराज चौधरी (राष्ट्रपती पारितोषिक प्राप्त शिक्षक) यांनी व्यक्त केले.

पिंपरी येथील आचार्य अत्रे सभागृहात साप्ताहिक पिंपरी चिंचवड पवनेचा प्रवाह, राष्ट्रीय श्रमिक आघाडी महाराष्ट्र आणि पुणे जिल्हा गुणवंत कामगार विकास समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात सा. पवनेचा प्रवाह दिवाळी विशेषांक-२०२२ व गुणवंत कामगार- शिवाजीराव शिर्के लिखित गरूड भरारी – सातारच्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वांची, या पुस्तकांचा प्रकाशन समारंभ आणि पुणे जिल्हा गुणवंत कामगार विकास समिती, पुणे या संस्थेचा रौप्य महोत्सव दिन साजरा करण्यात आला, या प्रसंगी ह.भ.प. किसन महाराज चौधरी बोलत होते.

कार्यक्रमाच्या व्यासपीठावर कामगार नेते यशवंतभाऊ भोसले अध्यक्षस्थानी होते. चौधरी महाराज, ज्येष्ठ उद्योजक – रामदास माने, व्याख्याते, निवेदक- श्रीकांत चौगुले, गुणवंत कामगार, शिवाजीराव शिर्के, यशवंत (अण्णा) साळुंखे आणि संत तुकाराम महाराजांच्या भूमिकेत, गुणवंत कामगार/पुणे जिल्हा गुणवंत कामगार विकास समिती, पुणे, अध्यक्ष- प्रकाश बाजीराव घोरपडे आदी उपस्थीत होते. तसेच गुणवंत कामगार- सोमनाथ कोरे, प्रभाकर कोळी, बाळकृष्ण बाचल, अण्णा गुरव, शामराव साळुंखे, प्रकाश देवरूखकर, पांडुरंग दोडके, ज्येष्ठ पत्रकार नाना कांबळे, पिंपरी चिंचवड पत्रकार संघटनेचे अध्यक्ष अनिल वडघुले, अविनाश आदक, सीता जगताप, सुरज साळवे आणि छोट्या-मोठ्या कंपन्यामध्ये काम करणारे कामगार बहुसंखेने उपस्थीत होते.

सुरवातीला श्री. गणेश प्रतिमेला हार घालून, ज्योत प्रज्वलीत करून कार्यक्रमास सुरवात झाली. प्रकाश घोरपडे यांच्या स्वागतगीताने कार्यक्रमाची सुंदर सुरवात झाली. त्यानंतर डॉ. रामचंद्र देखणे यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. उपस्थीत सर्व मान्यवर पाहुण्यांचे शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.

प्राप्ताविक गुणवंत कामगार/ ज्येष्ठ पत्रकार – शिवाजीराव शिर्के यांनी केले. त्यानंतर सा. पवनेचा प्रवाह दिवाळी अंक २०२२ चे प्रकाशन करण्यात आले. सोबत शिवाजीराव शिर्के लिखित गरुड भरारी-सातारच्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वांची, या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.

पुढे चौधरी महाराज म्हणाले, गरूड भरारी या पुस्तकाचे लेखक शिवाजीराव शिर्के यांचे वय ७८ असून ते या वयातही पुस्तकाची डिटीपी पासून वितरणापर्यंतचे काम करीत आहेत. हा आदर्श इतरांनी घेण्यासारखा आहे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेक क्रांतीकारकांनी भूमिगत राहुन लढा दिला, त्यांचे चरित्राच्या माध्यमातून भावी पिढीला प्रेरणा मिळेल असे हे पुस्तक आहे.

ज्या, ज्या कामगारांनी कंपनीत आणि समाजात उल्लेखनीय कार्य केले अशा ३२ गुणवंत कामगारांना समाज भूषण पुरस्कार-२०२२ हा पुरस्कार व सन्मानपत्र, शाल, श्रीफळ व पुस्तके देऊन सन्मान करण्यात आला. त्यामध्ये सुभाष शहा, तानाजी एकोंडे, सोमनाथ कोरे, शिवाजी माने, सदाशिव बोराटे, प्रभाकर कोळी, माऊली कातोरे, माधवराव अडसुळे, यशवंत (आण्णा) साळुंखे, पत्रकार-नाना कांबळे, अनिल वडघुले आदी ३२ जणाना समाजभूषण पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.

सन्मानाला उत्तर देतांना सुरेश कंक आणि तानाजी एकोंडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले तर सुभाष शहा यांनी काव्यातून शुभेच्छा व्यक्त केल्या.

प्रकाश घोरपडे यांनी पुणे जिल्हा गुणवंत कामगार विकास समितीच्या बाटलीवर मनोगत व्यक्त केले. श्रीकांत चौगुले / सर म्हणाले सा. पवनेचा प्रवाह हा दिवाळी अंक २०२२ कामगारांच्या साहित्याला वाहिलेला उत्कृष्ट दिवाळी अंक आहे. कामगार साहित्यिक यामुळे छान लिहू लागले आहेत. दिवाळीत जसे मिठांनी मन आनंदीत होते, याप्रमाणेच या दिवाळी अंकातील साहित्याने वाचकांची बौध्दिक भूक भागविली जाईल. पवनेचा प्रवाह दिवाळी अंक म्हणजे साहित्याची मेजवाणीच असते.

उद्योजक रामदास माने म्हणाले की, कुठलाही उद्योग चालवणे आता सोपे राहिले नाही. कामगार समस्या, लाईट, पाणी, सरकारचे कर, आणि उद्योगातील स्पर्धा यामुळे उद्योजकांना उद्योग चालविणे कठीण झाले आहे. ज्या नवविवाहीत मुलींना आपल्याकडे शौचालय नसेल तर त्यांच्यासाठी मोफत शौचालय देण्याची घोषणा उद्योजक रामदास माने यांनी याप्रसंगी व्यक्त केली.

यशवंतभाऊ भोसले म्हणाले की, पूर्वी सारखी कामगार चळवळ आता राहिली नाही. कंत्राटी पध्दतीने कामगारांची भरती होत असल्याने कायम कामगारापेक्षा कंत्राटदार हा मोठा होत आहे. पूर्वी कामगार नेत्याला उद्योजक घाबरत होते. आता कामगार नेता त्यांना नक्षलवादी वाटू लागला आहे असे वाटते. असंघटीत व संघटीत कामगारांच्या न्याय हक्कासाठी मी सदैव लढत राहणार आहे असे भोसले यांनी आपल्या मनोगतातून विचार व्यक्त केले.

सुत्रसंचालन सुभाष चव्हाण यांनी केले, तर आभार मनोहर दिवाण यांनी मानले. पसायदान म्हणून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

              

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *