पुणे : कोरोना पाश्वभूमीवर वाढिदवस साध्या पद्धतीने साजरा करणार असून त्यानिमित्त कोणताही समारंभ करणार नाही. तसेच शुभेच्छांसाठी दूरध्वनीवरून अथवा व्हिडिओ द्वारे आपण संवाद साधु. व सोशल डिस्टंसिंगचे पालन करून वाढदिवसासाठी सहकार्य करावे. असे आवाहन विधान परिषद उपसभापती ना. डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केले आहे.
आवाहन करताना डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या कि, सप्टेंबर २०२०, पावसाळी अधिवेशनामध्ये जे काम झाले, त्याच्या मध्ये महाराष्ट्र विधान परिषद उपसभापती म्हणून परत एकदा माझी फेरनिवड करण्यात आली. यासाठी शिवसेनेचे पक्षप्रमुख व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेचे नेते मंडळी यांनी माझ्या नावाची सहमती दिली आणि सभागृहांमध्ये ही बिनविरोध निवड करण्यात आली. त्याबद्दल मी महाराष्ट्रातातील जनतेचे आभार मानते. हिंदुह्रदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी सातत्याने ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारणाच धडा दिला होता त्यावरती वाटचाल करण्याचा माझा हेतू राहील.
या सर्व निवडणुकीवरती राष्ट्रवादीचे काँग्रेसचे नेते शरदचंद्र पवार हे काटेकोर लक्ष देऊन होते त्यांचे मी आभार मानते. आपले व यासर्व कामांमध्ये आई जगदंबा तुळजाभवानी यांचे आशीर्वाद मला मिळावेत अशी मी महाराष्ट्राच्या जनतेच्या चरणी मी प्रार्थना करते. माझा वाढदिवस लवकरच आहे. त्यावेळी कोणताही सभारंभ न करता सर्वांच्या शुभेच्छा माझ्यापर्यंत पोहोचतील अशी व्यवस्था आपण करु. असे आवाहन डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केले आहे.