ज्येष्ठ पत्रकार ॲड. संजय माने यांना मातृशोक ; इंदुबाई माने यांचे निधन…

पिंपरी | झुंज न्यूज : ज्येष्ठ पत्रकार ॲड. संजय माने यांच्या मातोश्री श्रीमती इंदुबाई गणपत माने (वय ७२वर्षे)यांचे सोमवारी (दि.२६) रात्री निधन झाले.
त्यांच्या मागे ॲड. सुनील माने आणि ॲड. संजय माने, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
श्रीमती इंदुबाई माने यांच्यावर पिंपरी चिंचवड लिंक रोड येथील स्मशानभुमी येथे आज मंगळवारी सकाळी १०:३० वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

“झुंज न्यूज” परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली !!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *