मनोरंजन विश्वातला तारा निखळला ! कॉमेडियन राजू श्रीवास्तव काळाच्या पडद्याआड ; वयाच्या ५९ व्या वर्षी अखेरचा श्वास…

दिल्ली I झुंज न्यूज : मनोरंजन विश्वातून चटका लावणारी बातमी समोर आली आहे. आज कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांचं निधन झालं आहे. वयाच्या 59 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यावर दिल्लीच्या एम्स रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांना बरं करण्यासाठी डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र या प्रयत्नांना यश आले नाही. अखेर आज राजू श्रीवास्तव यांची प्राणज्योत मालावली.

त्यांच्या पार्थिवावर उद्या किंवा परवा अत्यंसस्कार करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. गेल्या 42 दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. अखेर आज त्यांचा मृत्यू झाला. त्यांचा जन्म 25 डिसेंबर 1963 रोजी झाला. त्यांनी अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केलं.

जिममध्ये वर्कआऊट करताना हार्ट अटॅक

राजू श्रीवास्तव यांना जिममध्ये वर्कआऊट करताना हार्ट अटॅक आला होता. ते वर्कआऊट करताना जमिनीवर कोसळले त्यानंतर लगेचच त्यांना दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेल्या 42 दिवसांपासून त्यांच्यावर दिल्लीच्या एम्समध्ये उपचार सुरू होते. मध्यंतरी त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत असल्याचा बातम्या देखील समोर आल्या होत्या. त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत असताना अचानक त्यांची तब्येत खालावली आणि आज त्यांचं निधन झालं. राजू श्रीवास्तव्य यांच्या निधनाने मनोरंजन क्षेत्रातून हळहळ व्यक्त होत आहे.

कोण आहेत राजू श्रीवास्तव?

राजू श्रीवास्तव हे गजोधर भैया म्हणून त्यांच्या चहात्यामध्ये प्रसिद्ध होते. त्यांनी अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये भूमिका केली. त्यांनी बाजीगर, बिग ब्रदर, बॉम्बो टू गोवा, मैने प्यार किया अशा अनेक चित्रपटात भूमिका केली. तेजाब हा राजू श्रीवास्तव यांचा पहिला चित्रपट होता. तेजाब सुपरहिट ठरला त्यानंतर राजू श्रीवास्त यांनी कधीही मागे वळून पाहिले नाही.

       

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *