राज्य प्रकल्प संचालकांची आदर्श शाळा वाबळेवाडीस भेट
शिरूर I झुंज न्यूज : महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेचे राज्य प्रकल्प संचालक कैलास पगारे यांनी शिरूर तालुक्यातील आदर्श शाळा वाबळेवाडीस भेट दिली. यावेळी त्यांनी शाळेत चाललेल्या विविध उपक्रमांची माहिती घेतली. शाळेतील विद्यार्थ्यांशी संवाद साधला व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण तयारीबाबत समाधान व्यक्त केले.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त तालुकास्तरावरील स्पर्धेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले. त्याचबरोबर वक्तृत्व आणि सांस्कृतिक उपक्रमांसाठी जिल्हास्तरावर निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी त्यांच्यापुढे सादरीकरण केले.
“शाळेतील विद्यार्थ्यांनी इयत्ता पाचवी व आठवी शिष्यवृत्तीमध्ये मिळवलेल्या सलग विक्रमी यशाबद्दल विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे विशेष कौतुक केले. साहेबांनी शालेय परिसर, पर्यावरणस्नेही इमारत व नवीन इमारत यांची पाहणी करून समाधान व्यक्त केले. त्याचबरोबर वाबळेवाडी शाळेच्या धर्तीवर अनेक शाळांची उभारणी होणे गरजेचे आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले .
याप्रसंगी शिरूर तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी अनिल बाबर, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद पुणे येथील सहाय्यक कार्यक्रम अधिकारी दत्तात्रय वाडेकर, पंचायत समिती शिरूरचे विषयतज्ञ देवकाते, श्रीम. गावडे, शाळेचे मुख्याध्यापक विठ्ठल पवार, उपमुख्याध्यापिका शरिफा तांबोळी, शिष्यवृत्ती तज्ञ एकनाथ खैरे, सुनिल पलांडे, जयश्री पलांडे, किरण अरगडे, गोरख काळे, प्रतिभा पुंडे, तुषार सिनलकर, दीपक खैरे, पोपट दरंदले, संदीप गिते, विद्या सपकाळ आणि साहित्यिक शिक्षक सचिन बेंडभर उपस्थित होते. तर शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा सुरेखा वाबळे, ग्रामपंचायत सदस्य प्रकाश वाबळे, माजी उपसरपंच भगवान वाबळे, ज्येष्ठ नागरिक व माजी सरपंच केशव वाबळे, तंटामुक्त समिती अध्यक्ष अंकुश वाबळे, सदस्य प्रकाश वाबळे आदी मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते.