जालना I झुंज न्यूज : जालना तालुक्यातील राजर्षी छञपती शाहू महाराज विद्यालय डुकरी पिंपरी विद्यालयातील इयत्ता दहावीच्या विद्यार्थिनींनी १ मीटर व्यासाची राखी झाडाला बांधून रक्षाबंधन साजरे केले.
निसर्गामध्ये झाड किती महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असते, त्याची किती आवश्यकता आहे. याची जाणीव सर्वांनाच आहे. प्रत्येक झाड जगले पाहिजे, झाडाचे संवर्धन झाले पाहिजे, असे प्रतिपादन शाळेचे मुख्याध्यापक सी.जी.वाघमारे यांनी केले. या वेळी सजीव सृष्टीचे रक्षण करणाऱ्या निसर्गाला मानवजातीच्या रक्षणाचे आवाहन करण्यात आले.
विद्यार्थिनींनी झाडाला राखी बांधून भाऊ मानून, तुझी आम्हाला गरज असल्याचे मत व्यक्त केले. राजर्षी छञपती शाहू महाराज विद्यालय डुकरी पिंपरी या शाळेत शासन परीपत्रकाप्रमाणे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव, निमित्त घर तिरंगा रांगोळी स्पर्धा घेण्यात आल्या कार्यक्रम घेतला व त्यांची व त्यांची अमलंबजावणी करण्यात आली.
राष्ट्रीय हरित सेना विभाग व पर्यावरण विभाग प्रमुख ठाकरे आर.एस यांच्या मार्गदर्शनुसार झाडाला राखी बांधुन रक्षाबंधन साजरे करत पर्यावरणाचा संदेश देण्यात आला.
राजर्षी छञपती शाहू महाराज विद्यालयामार्फत असे विविध उपक्रम हाती घेऊन निसर्ग संवर्धनाविषयी जनजागृती करून पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यात येतो. राष्ट्रीय हरित सेना विभागामार्फत झालेल्या या रक्षाबंधनाप्रसंगी ,शिक्षक प्रतिनिधी श्रीमती. कुलकर्णी. एस. आर., श्री. मदन.वाय.बी., सोनकांबळे. डी.एन., श्री. नागरे. पी.पी., श्रीमती. देशपांडे. ए. बी., श्री. जाधव एल. बी., श्री. ठाकरे. आर.एस., श्री. राऊत. एस.बी., श्रीमती. खरात. एम.ए. उपस्थित होते.
“विद्यार्थ्यांनी झाडांना बांधल्या विद्यालयात विद्यार्थी- विद्यार्थिनींनी वृक्षांना राखी बांधून रक्षाबंधनाचा दिवस साजरा केला. भविष्यात मानवाच्या रक्षणासाठी जीवसृष्टी वाचवण्याची गरज असल्याने व निसर्गाचा समतोल राखण्यासाठी वटवृक्ष लागवड करून व असण्याची झाडांची काळजी घेऊन त्यांचे रक्षण करण्याची गरज आहे. वृक्षांचे महत्त्व लक्षात घेऊन विद्यार्थी व शिक्षकांनी वृक्षांना राख्या बांधण्याचा आगळावेगळा उपक्रम साजरा केला. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.