बौद्ध नगरमधील अभिनय कौशल्य अवतरणार रंगमंचावर ; चिमुकल्यांनी घेतला ऑडिशनचा आनंद…

पिंपरी I झुंज न्यूज : बौद्ध नगरमधील अभिनय कौशल्य लवकरच रंगमंचावर अवतरणार असून त्यानिमित्ताने बौद्ध नगर मधील जिम हॉल येथे लहान व मोठ्या कलाकारांसाठी ऑडिशन आयोजित करण्यात आले होते.

परिसरातील विद्यार्थी आणि पालकांना एकत्रित रंगमंचावर अभिनय कला सादर करता यावी म्हणून येथील परिवर्तन युवा एकता च्या वतीने कलाकारांसाठी हि निवड चाचणी घेण्यात आली होती. यामध्ये एकूण 51 इच्छुक कलाकारांनी सहभाग घेतला. लहान मुला मुलींचा यात जास्त सहभाग आणि उत्साह दिसून आला.

बौद्धनगर आणि भाटनगर मध्ये सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, राजकीय, आर्थिक आणि भौगोलिक परिवर्तन घडवून अनण्याच्या उद्देशाने, परिवर्तन युवा एकताची स्थापना झाली असून सर्वांनी राजकीय हेवे दावे बाजूला ठेऊन परिसराचे परिवर्तन घडवून आणण्यासाठी एकत्रित काम करण्याचे सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी ठरवले आहे.

या माध्यमातून जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने बौद्धनगर मधील उच्च पदावर पोहचलेल्या महिलांचा सन्मान करून पाहिला कार्यक्रम यशस्वी केल्यानंतर आता येथील कला कौशल्य अवगत असलेल्या विद्यार्थी विद्यर्थीनी आणि पालकांना योग्य ती संधी उपलब्ध व्हावी म्हणन ऑडिशन ऑडिशन घेण्याचा यशस्वी कार्यक्रम झाला. ऑडिशन कार्यक्रमाच्या अयोजनामध्ये , परिवर्तन युवा एकताचे सर्वच पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

“ऑडिशनसाठी आलेल्या सर्वच मुला मुलींबरोबर पालकांना नाटकात संधी मिळणार असून त्यांच्यासाठी 15 दिवसांसाठी मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे. द रायझिंग स्टार्स थिएटसर्स चे संचालक लेखक दिग्दर्शक विनय सोनवणे हे अभिनय प्रशिक्षण देणार आहेत. तर लिटल सायंटिस्ट ग्रुपच्या वतीने विशेष सहकार्य देऊन येथील कलागुणांना वेगवेगळ्या मंचावर संधी उपलब्ध करून देण्याचे दत्ता गिरमकर यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *