कराड I झुंज न्यूज : सध्या समाज माध्यमांचा प्रभाव जलद गतीने वाढत असल्यामुळे महाराष्ट्रभर सोशल मीडिया परिषद संघटना वाढविण्याच्या दृष्टीने प्रयत्न करत असल्यामुळे राज्यभर जिल्हास्तरावर परिषदेच्या शाखा निर्मितीचा कार्यक्रम हाती घेतला असून या दृष्टीने महाराष्ट्रभर दौरा करण्यात येत असल्याची माहिती सोशल मीडिया परिषद महाराष्ट्र राज्याचे प्रमुख बापूसाहेब गोरे यांनी सांगितले.
कराड येथे दैनिक लक्ष्मीपुत्र कार्यालयाला सदिच्छा भेट दिल्यानंतर त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी राजसत्यचे संपादक गोरख तावरे, पुणे दर्शनचे संपादक विश्वास शिंदे, कराडचे पुण्यनगरी शहर प्रतिनिधी सचिन देशमुख, लक्ष्मीपुत्रचे संपादक सुलतान फकीर, पुणे दर्शनचे प्रतिनिधी अतुल वैराट, पिंपरी-चिंचवड सोशल मीडिया अध्यक्ष सुरज साळवे, कोषाध्यक्ष सुनील कांबळे, कार्यकारिणी सदस्य जितेंद्र गवळी, गणेश शिंदे तसेच सोशल मीडिया परिषद सातारा जिल्ह्यातील अध्यक्ष दीपक शिंदे, उपाध्यक्ष संग्राम निकाळजे, सचिव पद्माकर सोळवंडे, खजिनदार प्रशांत जगताप उपस्थित होते.
माध्यमांचे बदलते स्वरूप पाहता सोशल मीडियावरील माध्यमांचा प्रभाव समाज मनावर अधिक गतीने वाढत असल्यामुळे या माध्यमांचे सकारात्मक संघटन करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्रभर प्रयत्न सुरू आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून समाजातील सकारात्मक घटनांचे वृत्तांकन योग्यरीतीने व्हावे. समाज माध्यमांमध्ये काम करणाऱ्या प्रतिनिधींना मार्गदर्शन व दिशा योग्य मिळावी, यासाठी सोशल मीडिया परिषद प्रयत्नशील असल्याचेही बापूसाहेब गोरे यांनी यावेळी सांगितले.
प्रिंट मीडियाचा विश्वासहार्य प्रभाव कायम आहे. दरम्यान अलीकडे निर्माण झालेल्या इलेक्ट्रॉनिक मीडिया व सोशल मीडियाचा प्रभावही चांगला आहे. या माध्यमांमध्ये काम करणारे नवोदितांना चांगल्या प्रकारे मार्गदर्शन होणे अपेक्षित आहे. याचा विचार करून सोशल मीडिया परिषद कार्यरत आहे. असे सांगून बापूसाहेब गोरे म्हणाले, मराठी पत्रकार परिषदेशी संलग्न सोशल मीडिया परिषद कार्यरत आहे.
“मराठी पत्रकार परिषदेशी संलग्न असणाऱ्या सोशल मीडिया परिषदेचे राज्याध्यक्ष बापूसाहेब गोरे यांनी सातारा येथे सदिच्छा भेट देऊन स्थानिक पदाधिकाऱ्यांशी विविध विषयावर चर्चा केली. सोशल मीडिया परिषदेच्या सातारा जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांचा जिल्हा संघटनेच्या वतीने एक लाखाचा विमा उतरविण्यात आला आहे. या उपक्रमाचे कौतुक करून याचे वितरण सातारा शहरातील प्रतिनिधींना वाटप करण्यात आले असून जिल्ह्यातील इतर तालुक्यातील सदस्यांना लवकरच वाटप करण्यात येणार असल्याचे बापूसाहेब गोरे यांनी सांगितले.