बाबो ! शेळीच्या पोटी जन्मले चक्क माणसासारखे दिसणारे पिल्लू ; हुबेहूब तोंड, शेपूटही नाही…

गुवाहाटी I झुंज न्यूज : शेळीच्या पोटी चक्क मानवी बाळासारख्या दिसणाऱ्या पिल्लाने जन्म घेतला. आसाममधील कछार जिल्ह्यातील धौलाई विधानसभा क्षेत्रातील गंगा नगर गावात ही आश्चर्यकारक घटना उघडकीस आली आहे. एका पाळीव शेळीने माणसा सारख्या दिसणाऱ्या बाळाला जन्म दिला. या पिल्लाचे दोन पाय आणि कान सोडले, तर बाकीचे शरीर मानवसदृश्य होते. मात्र जन्मानंतर अवघ्या अर्ध्या तासातच पिल्लाचा मृत्यू झाला.

प्राण्यांच्या पोटी चित्रविचित्र दिसणाऱ्या पिल्लांचे फोटो आपण आतापर्यंत पाहिले आहेत. मात्र थेट माणसाच्या चेहऱ्याशी साधर्म्य असलेलं पिल्लू आढळल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

चेहरा लहान मुलासारखा

शेळी मालकाने सांगितले, की सोमवारी त्याच्या शेळीने मानवी शरीराप्रमाणे दिसणाऱ्या पिल्लाला जन्म दिला. हे पाहून घरातील सर्वांनाच धक्का बसला. त्याचा संपूर्ण चेहरा लहान मुलासारखा होता आणि मुलाला शेपूटही नव्हते. हे वृत्त गावात वाऱ्यासारखे पसरले. त्यानंतर गावातील नागरिकांनी पिल्लाला पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती. ही घटना सध्या संपूर्ण परिसरात चर्चेचा विषय ठरली आहे.

काही तासातच मृत्यू

शेळीने एका अविकसित जीवाला जन्म दिल्याचे फोटोमध्ये दिसून येते. तिचा चेहरा माणसांसारखाच दिसतो. काळ्या शेळीच्या पोटातून तपकिरी रंगाचे पिल्लू जन्माला आल्यानंतर आपल्या पूर्वजांपैकी कोणीतरी शेळीच्या पोटी जन्म घेतला असावा, अशी गावकऱ्यांनी समजूत केली होती. मात्र, हे पिल्लू जास्त काळ तग धरु शकले नाही. यानंतर गावकऱ्यांनी पारंपारिक रितीरिवाजानुसार त्याचे दफन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *