रांची I झुंज न्यूज : भाजपच्या खासदाराने भर कार्यक्रमात स्टेजवरच युवा मल्लाच्या कानाखाली दोन वेळा लगावल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. विशेष म्हणजे कानाखाली लगावणारे खासदार ब्रिजभूषण शरण हे भारतीय कुस्ती संघटनेते अध्यक्ष आहेत. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे.
झारखंडच्या राजधानीमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. ब्रिजभूषण शरण हे उत्तर प्रदेशातील कैसरगंज मतदारसंघातील खासदार आहेत. राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा (15 वर्षांखालील गट) रांचीत सुरू आहेत.
या स्पर्धेच्या पहिल्या दिवशी प्रमुख पाहुणे म्हणून शरण उपस्थित होते. हा कार्यक्रम शहीद गणपत राय इनडोअर स्टेडियममध्ये झाला. याचवेळी ही घटना घडली आहे. या घटनेमुळे स्पर्धेच्या आयोजनाला गालबोट लागल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
कार्यक्रमात स्टेजवर युवा मल्ल मुलगा आला. त्याने स्पर्धेत खेळण्याची परवानगी शरण यांच्याकडे मागितली. परंतु, त्याचे वय जास्त असल्याचे कारण देत त्याला खेळण्यास नकार देण्यात आला. तरीही तो वारंवार विनवणी करू लागला. यामुळे खासदार शरण यांचा पारा चढला. त्यांनी अखेर त्या मल्लाचा कानाखाली लगावली. यामुळे स्टेजवरील सर्वांनाच धक्का बसला. युवा मल्लाच्या अंगावर जाणाऱ्या खासदारांना अखेर स्टेजवरील काही जणांनी आवरले. अखेर त्या मल्लाला स्टेजवरून खाली पाठवण्यात आले.
#यूपी के #भाजपा सांसद ब्रजभूषण शरण सिंह ने रांची में नौजवान कुश्ती खिलाड़ी को मंच पर ही थप्पड़़ों मारे ||
वीडियो वायरल pic.twitter.com/XLAKgP4MHZ— Sumit Kumar (@skphotography68) December 18, 2021