पिंपरी I झुंज न्यूज : तमाम शिवसैनिकांच्या माँ साहेब असलेल्या मिनाताई ठाकरे यांचा स्मृतिदिन आकुर्डी येथील शिवसेना भवनात सोमवारी (ता. ६) साजरा करण्यात आला. जिल्हा संघाटिका सुलभा उबाळे व शहर प्रमुख एड. सचिन भोसले यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले.
यावेळी मनोगतातून मीनाताई ठाकरे यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला. सहसंपर्क प्रमुख योगेश बाबर, शहर संघटिका ऍड. उर्मिला काळभोर, उपजिल्हा संघटिका वैशाली मराठे, शहर संघटक रोमी संधू, चिंचवड विधानसभा प्रमुख अनंत कोऱ्हाळे, संघटकीका अनिता तुतारे, चिंचवड विधानसभा संघटिका शैला पाचपुते, उपशहर प्रमुख सुधाकर नलावडे, विभाग प्रमुख सतिश मरळ, सय्यद पटेल, कार्यालय सचिव ज्ञानेश्वर शिंदे विभाग संघटक राजेंद्र पलांडे, सचिन कुंदाजवार, प्रविण पाटील, युवराज कोकाटे, चंद्रकांत सरडे, सुदर्शन देसले, सचिन झरेकर, परशुराम आल्हाट, महिला संघटीका मंदा फंड, मीना डेरे, शशिकला उभे, बेबी सय्यद, शारदा वाघमोडे, वैशाली काटकर, रोहिणी कोबल, योगिणी मोहन, प्रियंका घोडके इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.