बुलडाणा | झुंज न्यूज : श्री संत गजानन महाराज शेगाव संस्थानचे विश्वस्त शिवशंकर भाऊ पाटील यांचे आज दि. ४ ऑगस्ट, बुधवारी दुपारी ५ वाजता निधन झाले. ते ८२ वर्षांचे होते. मागील तीन दिवसांपासून मल्टीऑर्गन फेल्युअरमुळे आजारी होते. ‘मला कुठल्याही दवाखान्यात हलवू नका’ असे त्यांनी सांगितल्याने त्यांच्यावर राहत्या घरीच पूर्ण मेडिकल सेटअपसहीत उपचार सुरू होते. दरम्यान, कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शेगावमध्ये भाविकांनी गर्दी करू नये, असे आवाहन संस्थानतर्फे करण्यात आले आहे.
शिवशंकर भाऊ पाटील यांच्या निधनानंतर विविध क्षेत्रांमधून शोक व्यक्त आहे. ‘श्री संत गजानन महाराज संस्थान, शेगावचे प्रमुख विश्वस्त श्री शिवशंकर भाऊ पाटील यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दुःख दायक आहे. त्यांना भावपुर्ण श्रध्दांजली.! संस्थानचे पावित्र्य जपण्याबरोबरच संस्थानला सामाजिक कार्याची जोड देत त्यांनी समाजापुढे एक आदर्श निर्माण केला. शिवशंकर भाऊ पाटील कायम स्मरणात राहतील. ईश्वर दिवंगत आत्म्यास शांती देवो. ॐ शांती.’ या शब्दांत केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी भावना व्यक्त केल्यात.
‘शेगाव संस्थानचे विश्वस्त शिवशंकर भाऊ पाटील यांच्या निधनामुळे आयुष्यभर निस्वार्थपणे संत गजानन महाराजांची सेवा करणारे ऋषितुल्य व्यक्तीमत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. संस्थानच्या सेवाभावी कार्याच्या विस्तारामध्ये त्यांची भूमिका नेहमी स्मरणात राहील. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.’ असे ट्विट राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केले आहे.
शिवशंकर पाटील यांनी गजानन महाराजांच्या विचारांचा वारसा जोपासला : नितीन गडकरी
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शिवशंकर भाऊ पाटील यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे. श्री संत गजानन महाराज शेगांव संस्थानचे विश्वस्त शिवशंकर भाऊ पाटील यांच्या निधनाचे वृत्त ऐकून अतिशय दु:ख झाले. त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली. शिवशंकर भाऊ यांनी समर्पित वृत्तीने व प्रामाणिकपणे श्री गजानन महाराजांच्या विचारांचा वारसा जोपासला, असं नितीन गडकरी म्हणाले.
व्रतस्थ सेवेकरी, मॅनेजमेंट गुरू, निष्काम कर्मयोगी आपण गमावला : देवेंद्र फडणवीस
शिवशंकर पाटील यांच्या निधनानंतर सर्व स्तरातून दु:ख व्यक्त करण्यात येत आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनते देवेंद्र फडणवीस यांनी पाटील यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. “श्री संत गजानन महाराज संस्थान, शेगावचे प्रमुख शिवशंकर भाऊ पाटील यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दुःखद आहे. त्यांच्या निधनाने एक व्रतस्थ सेवेकरी, मॅनेजमेंट गुरू, निष्काम कर्मयोगी आपण गमावला आहे. शिवशंकर भाऊ हे समर्पण भावाचे मूर्तिमंत होते. शेगावला जायचो तेव्हा अनेकदा त्यांची भेट व्हायची.
प्रत्येकवेळी आपुलकीने विचारपूस करायचे, शेगाव संस्थानचे प्रश्न सोडवून घ्यायचे. मुख्यमंत्री म्हणून त्यांच्या कार्याला हातभार लावण्याची संधी मिळणे हे माझे भाग्य होते. महाजनादेश यात्रेप्रसंगी सुद्धा शेगावला दर्शनाला गेलो, तेव्हा त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा झाल्या होत्या. त्यांच्या निधनाने मी व्यक्तिगत मार्गदर्शकाला मुकलो आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो,” असा शोकसंदेश फडणवीस यांनी दिला आहे.
_ 📽️एकदा 🤩 बघाच…!_
The Rising 🎬Stars Film Production निर्मित 🥳 माझं नवीन 🕺🏻धिंगाणा 😎अल्बम साँग 😱 “ओsss शेठ… 😈 या पाहटं पाहटं”… 🎼आपल्या मनोरंजनासाठी घेउन आलो आहोत. 💥 आजच्या वस्तुस्थितीला 🤓 लक्षात घेऊन या गाण्याची निर्मिती केली आहे…📽️ आता, रुबाबात 😈फिरणाऱ्या “शेठ” चा..🤓 जाळ अन् धुर तर 🔥निघणारच ना… ओ शेठ !!