अखेर ! तळेगाव – चाकण – शिक्रापूर रस्त्याच्या चौपदरीकरणासाठी १०१५ कोटींचा निधी मंजूर ; खासदार डॉ. अमोल कोल्हे व आमदार सुनील शेळके यांच्या सामुहीक प्रयत्नांना यश

चाकण | झुंज न्यूज : गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या तळेगाव – चाकण – शिक्रापूर रस्त्याच्या चौपदरीकरणाच्या कामासाठी खासदार डॉ. अमोल कोल्हे आणि आमदार सुनील शेळके यांनी केलेल्या प्रयत्नांना यश आले असून केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने या ५४ कि. मी. लांबीच्या रस्त्यासाठी १०१५ कोटींचा निधी मंजूर केला आहे. त्याचबरोबर शिरूर तालुक्यातील न्हावरा ते चौफुला रस्त्यासाठीही २२० कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

मतदारसंघाचा विकास करायचा असेल तर आधी पायाभूत सुविधा उपलब्ध होणे आवश्यक आहे. त्यामुळे खासदार झाल्यानंतर डॉ. कोल्हे यांनी रस्ते विकासाच्या प्रलंबित कामांवर लक्ष केंद्रित केले होते. त्यानुसार तळेगाव – चाकण – शिक्रापूर रस्त्याच्या रुंदीकरणाच्या कामासाठी खासदार डॉ. कोल्हे व आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्यातून अनेकदा बैठका झाल्या.

तळेगाव शहरात असणारी जागेची अडचण लक्षात घेऊन बाह्यवळण रस्ता करण्यासाठी पीएमआरडीए, एमएसआरडीसी, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व सार्वजनिक बांधकाम (नॅशनल हायवे विभाग) यांची संयुक्त बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत अनेक पर्यायांवर चर्चा झाल्यानंतर सध्या अस्तित्वात असलेल्या रस्त्याच्या उपलब्ध लांबीत चौपदरीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार खासदार डॉ. कोल्हे यांनी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्याशी पत्रव्यवहारही केला होता.

या प्रस्तावाला सकारात्मक प्रतिसाद देत सुरुवातीला केंद्रीयमंत्री गडकरी यांनी तळेगाव चाकण रस्त्यासाठी ३०० कोटी मंजूर केले होते. मात्र शिक्रापूर पर्यत पूर्ण रस्त्याचे रुंदीकरण आवश्यक असल्याने तळेगाव – चाकण – शिक्रापूर या ५४ कि. मी. रस्त्याच्या कामाचा प्रस्ताव विचाराधीन होता. या संदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सर्व संबंधितांची बैठकही घेतली होती.

या बैठकीला खासदार डॉ. कोल्हे, आमदार दिलीप मोहिते पाटील, आमदार सुनील शेळके व आमदार अॅड. अशोक पवार व विविध अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत उपमुख्यमंत्री पवार यांनी तळेगाव – चाकण – शिक्रापूर हा ५४ कि. मी. लांबीचे रुंदीकरण करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने तळेगाव – चाकण – शिक्रापूर या रस्त्यासाठी रु. १०१५ कोटी आणि न्हावरा – चौफुला रस्त्यासाठी रु. २२० कोटी रकमेच्या कामाला प्राथमिक मंजुरी दिली. 

या संदर्भात खासदार डॉ. अमोल कोल्हे म्हणाले की, मतदारसंघातील राष्ट्रीय महामार्गांची रखडलेली कामे मार्गी लावणे ही तातडीची गरज होती. त्यामुळे नियोजनबद्ध पद्धतीने प्रयत्न करुन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम (नॅशनल हायवे विभाग) तसेच प्रसंगी पीएमआरडीए, एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांशी समन्वय साधून पर्याय शोधण्यासाठी प्रयत्न केले.

या प्रयत्नांना आमदार सुनील शेळके व आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी दिलेली साथ यामुळे तळेगाव चाकण शिक्रापूर रस्त्याचे रुंदीकरणाचे काम मंजूर होऊ शकले. तसेच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी घेतलेला पुढाकार व केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी दिलेला सकारात्मक प्रतिसाद अशा एकत्रित प्रयत्नांमुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले काम मार्गी लागत आहे ही सर्वात महत्त्वाची बाब आहे. माझ्यादृष्टीने विचार करायचा तर मतदारांना प्रचारादरम्यान दिलेले वचन दोन वर्षातच पूर्ण करता आले याचा मनापासून आनंद आहे. त्यामुळे केंद्रीयमंत्री गडकरी, उपमुख्यमंत्री पवार यांचे मन:पूर्वक आभार व्यक्त करतो असे डॉ. कोल्हे यांनी आवर्जून सांगितले.

“केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने प्राथमिक मंजुरी दिलेल्या या कामाची निविदा प्रक्रिया व तांत्रिक बाबींची पूर्तता लवकरात लवकर पूर्ण करुन नोव्हेंबर अखेरपर्यंत प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार असल्याचे खासदार डॉ. कोल्हे यांनी सांगितले.

https://youtu.be/MTtW6j33Q_I

_*The Rising 🎬Stars Film Production* निर्मित 🥳 माझं नवीन 🕺🏻धिंगाणा 😎अल्बम साँग *😱 “ओ शेठ… 😈 या पाहटं पाहटं”…* 🎼आपल्या मनोरंजनासाठी घेउन आलो आहोत. 💥 आजच्या वस्तुस्थितीला 🤓 लक्षात घेऊन या गाण्याची निर्मिती केली आहे…📽️_ *_आता, रुबाबात 😈फिरणाऱ्या “शेठ” चा..🤓 जाळ अन् धुर तर 🔥निघणारच ना… ओ शेठ !!_*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *