प्रभाग क्रमांक १८ येथे “आरोग्यम धनसंपदा अभियान” ! ; उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम 

पिंपरी I झुंज न्यूज : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंञी आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंञी मा. नामदार अजितदादा पवार यांच्या वाढदिवसा निमित्त, रुपालीताई चाकणकर यांच्या संकल्पनेतून व निरीक्षक उज्जवलाताई शेवाळे यांच्या मार्गदर्शनाने चिंचवड विधानसभा प्रभाग क्र . १८ येथे, सचिन निंबाळकर चिं.वि. उपाध्यक्ष व चिं.वि.संघटिका ज्योती निंबाळकर यांनी लोकमान्य हॉस्पिटल चिंचवड ,राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी चिंचवड विधानसभा, पागेची तालीम व माऊली फाऊंडेशनच्या माध्यमातून प्रभागातील नागरिकांसाठी “आरोग्यम धनसंपदा अभियान” शिबिर आयोजित करण्यात आले.

शिबिराचे उद्घाटन शहराचे अध्यक्ष संजोगभाऊ वाघेरे, महिला शहराध्यक्षा वैशालीताई काळभोर, माजी विरोधी पक्षनेते नानासाहेब काटे यांच्या हस्ते झाले. शिबिरामध्ये अस्थिरोग, कर्करोग, कान , नाक, घसा आदि तपासण्या मोफत करण्यात आल्या. प्रभागातील नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग मिळाला. डॉ विशाल क्षिरसागर आणि डॉ शिल्पा क्षिरसागर यांनी महिलांना कर्करोगाविषयी उत्तम मार्गदर्शन केले. 

सुखदेव गोळे व त्यांच्या टीमने छान नियोजन केले. शिबिरा अंतर्गत ३०० लोकांनी मोफत तपासणीचा लाभ घेतला. कार्यक्रमला शहर कार्याध्यक्षा पुष्पाताई शेळके, चिं.वि.अध्यक्ष संगिताताई कोकणे, संदिप चिंचवडे, सुवर्णाताई वाळके, भारती कदम, खुशबू दिघे,पोर्णिमा पालेकर, स्वप्नाली आसोले, उषा चिंचवडे, वैशाली निंबाळकर, उर्मिला काळभोर, धनश्री खोल्लम, नम्रता धूमाळ, पै.तानाजी निंबाळकर, पै.किशोर निंबाळकर, धनंजय गावडे, हरिष अप्पा मोरे, सुरेश निंबाळकर आदि पदाधिकारी उपस्थित होते. पागेची तालीम सदस्य,सचिन निंबाळकर व ज्योती निंबाळकर या सर्वांनी मिळून कार्यक्रमाचे नियोजन सोशल डिस्टंटचे पालन करत उत्तम प्रकारे केले .

https://youtu.be/MTtW6j33Q_I

_*The Rising 🎬Stars Film Production* निर्मित 🥳 माझं नवीन 🕺🏻धिंगाणा 😎अल्बम साँग *😱 “ओ शेठ… 😈 या पाहटं पाहटं”…* 🎼आपल्या मनोरंजनासाठी घेउन आलो आहोत. 💥 आजच्या वस्तुस्थितीला 🤓 लक्षात घेऊन या गाण्याची निर्मिती केली आहे…📽️_ *_आता, रुबाबात 😈फिरणाऱ्या “शेठ” चा..🤓 जाळ अन् धुर तर 🔥निघणारच ना… ओ शेठ !!_*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *