देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसा निमित्त नगरसेविका अनुराधा गोरखे यांच्या वतीने भजनी मंडळाना साहित्य वाटप
पिंपरी I झुंज न्यूज : माननीय मा मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचा वाढदिवसानिमित्त दत्तनगर परिसरातील श्री दत्त महिला भजनी मंडळ यांना नगरसेविका अनुराधा गोरखे व प्रदेश सचिव अमित गोरखे यांच्या वतीने भजन साहित्य वाटप करण्यात आले, माननीय आमदार श्री महेश दादा लांडगे यांच्या शुभहस्ते हे साहित्य भजनी मंडळाला देण्यात आले.
“याप्रसंगी बोलताना आमदार लांडगे म्हणाले भजनी मंडळ एका अर्थाने लोकसेवेचे काम करीत आहे मंदिरांमध्ये अथवा घरात बसून एकचित्ताने भजन म्हणून देवाची प्रार्थना करणे व मन शांतीचा शोध घेणे ही एक प्रकारची लोकसेवा पुणे वॉच आहे माननीय फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त एक वेगळा उपक्रम यानिमित्ताने गोरखे परिवाराच्या वतीने घेतला आहे असेही त्यांनी नमूद केले.
या प्रसंगी माजी उपमहापौर तुषार हिंगे, अनुसूचित जाति मोर्चा चे अध्यक्ष श्री सुभाष सरोदे ,भाजपा स्वीकृत नगरसेवक सुनील कदम , सौ शुभांगी कसबे, निर्मला अलंकार,यशवंत दनाने,नेताजी शिंदे, विजय वाघमारे, अजिंक्य गोळे, विठ्ठल शिंदे,तानाजी साठे,सुनील शेलार, रोहन खुडे,भानुदास नेटके,प्रशांत शिंदे,अमोल कुचेकर,मनोज कसबे ,राजू विटकर,गणेश लोंढे उपस्थित होते, तान्हाजी साठे यांनी सूत्रसंचालन केले,अमित गोरखे यांनी प्रास्ताविक केले, नगरसेविका अनुराधा गोरखे यांनी आभार मानले.