माजी महापौर तथा राष्ट्रवादीचे नगरसेवक “योगेश बहल” यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम ; रक्तदान शिबिरात १०३ रक्तदात्यांनी नोंदवला सहभाग

पिंपरी I झुंज न्यूज : पिंपरी – चिंचवड महापालिकेचे माजी महापौर तथा राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नगरसेवक योगेश बहल यांच्या ५८ वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरात तब्बल १०३ जणांनी सहभाग नोंदवत रक्तदान केले. वाढदिवसानिमित्त यावेळी विविध सामाजिक कार्यक्रम राबवून वाढदिवस साजरा करण्यात आला.

सकाळी दहा वाजता जगदगुरु संत तुकाराम महाराज मंदिर सभागृहामध्ये योगेश बहल यांच्या हस्ते रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी नगरसेवक शाम लांडे , माजी नगरसेवक वसंत शेवडे , बबनराव गाढवे यांच्यासह कर्मचारी महासंघाचे अध्यक्षा अंबर चिंचवडे , सामाजिक कार्यकर्ते शेरबहादुर खत्री , किरण सुवर्णा , ज्ञानेश्वर कांबळे , नंदकुमार सूर्यवंशी , राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा जगताप यांच्यासह सर्व पदाधिकारी , युवक कार्यकर्ते विरेंद्र बहल, महेंद्र शर्मा , गोरोबा गुजर , हरप्रित सिंग, सुशीलकुमार घाग यांच्यासह अनेक मान्यवर व योगेश बहल मित्र परिवारातील सदस्य उपस्थित होते.

करोनाचे नियम पाळून झालेल्या कार्यक्रमात संत तुकाराम नगर परिसरातील नागरिकांसह शहरातील तरुणांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवत रक्तदान केले. यावेळी प्रत्येक रक्तदात्याचा ब्ल्यू टूथ हेडफोन सप्रेम भेट देऊन सन्मानित करण्यात आले. रक्तदान शिबिरासाठी यशवंतराव चव्हाण रुग्णालयाच्या रक्तपेढीचे सहकार्य लाभले.

उपमुख्यमंत्री अजित पवार व माजी महापौर योगेश बहल यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सामाजिक उपक्रमांच्या सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार दि.१८ जुलै आणि गुरुवार दि .२२ जुलै रोजी रक्तदान शिबिर आणि रुबी अलकेअरच्या सहकायनि मोफत हृदयरोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच प्रभागातील रिक्षाचालकांना अन्नधान्याचे वाटप करण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *